प्राथमिक तपासात फेक कॉल उघड
देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर बॉम्ब ठेवल्याची माहिती नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला पहाटेच्या वेळी मिळाली होती. धमकीचा फोन आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा कामाला लागली. बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांचा ताफा देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झाला. मध्यरात्री १२ ते पहाटे १च्या दरम्यान पथकाने घराची तपासणी केली. त्यानंतर हा फेक कॉल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकरणी धमकीचा फोन कॉल करणाऱ्याला अटक केली आहे. लाइट गेल्यामुळे रागाच्या भरात पोलिसांना फोन करून फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली होती, असे अटकलेल्या संबंधिताने सांगितले.
नितिन गडकरींनाही धमकीचे फोन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानीही काही दिवसांपूर्वी धमकीचे फोन आले होते. कॉलवरून नितीन गडकरींकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. धमकी देणाऱ्या जयेश पुजारी याला अटक करून नागपूरात अण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी नितीन गडकरींच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
उद्धव ठाकरे सत्तेसाठी युतीत, एकेरी उल्लेख करत बावनकुळेंची टीका