मुंबई : मार्च २०२३ आता निरोप घेण्याच्या उंबरठ्यावर आहे. अजून तीन दिवस बाकी आहे आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्य नागरिकांच्या महागाईत आणखी वाढ होणार आहे. १ एप्रिलपासून अनेक वस्तू महागणार आहेत, ज्याचा थेट फाटक सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आहे. देशातील सामान्य नागरिकाला आधीपासूनच महागाईचे चटके बसत आहेत, अशा स्थितीत मालाचे भाव वाढल्याने त्यांच्या खिशावरील भार आणखी वाढणार आहेत. एप्रिलमध्ये काही वस्तूंच्या किमतीही कमी होणार आहेत. येथे आम्ही तुम्हाला महागड्या आणि स्वस्त अशा दोन्ही वस्तूंची यादी देणार आहोत. यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. एप्रिलमध्ये काय महाग होणार आणि काय स्वस्त होणार आहे ते सविस्तर जाणून घेऊ.

…तर भयानक मंदी येईल, जागतिक बँकेचा गंभीर इशारा, गेल्या दशकाची प्रगतीही वाया जाणार
१ एप्रिलपासून कोणत्या वस्तू महागणार

घरगुती इलेक्ट्रॉनिक चिमणी
दागिने
आयात केलेल्या वस्तू
सिगारेट
सोनं
प्लॅटिनम
चांदीची भांडी

आधीच महागाई, त्यात दरवाढीची भीती! आरबीआय रेपो दरवाढीवर SBI चा अहवाल, दिलासा की धक्का?
देशांतर्गत उद्योगाला बळकटी देण्यासाठी सरकार १ एप्रिल २०२३ पासून आयात शुल्क वाढवण्याचा विचार करत आहे. केंद्र सरकारने आयात शुल्क वाढवले तर अनेक वस्तूंचे भाव वाढतील. यामुळे प्लास्टिकच्या वस्तू, दागिने, हाय-ग्लॉस पेपर, जीवनसत्त्वे, खाजगी विमाने, हेलिकॉप्टर आणि हाय-एंड इलेक्ट्रॉनिक्सच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ मध्ये इलेक्ट्रिक फायरप्लेस, सोने आणि प्लॅटिनम सारख्या वस्तूंच्या किमती १ एप्रिलपासून वाढणार असल्याची घोषणा केली.

कोणत्या वस्तू स्वस्तात मिळणार
खेळणी
सायकल
टीव्ही
मोबाईल
इलेक्ट्रिक वाहने
एलईडी टीव्ही
कॅमेरा लेन्स

शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी, ‘डीमॅट केवायसी’ची मुदत वाढली
१ फेब्रुवारी रोजी नवीन आर्थिक वर्षाच्या सामान्य अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी कॅमेरा लेन्स, स्मार्टफोन यासारख्या वस्तू स्वस्त होतील, अशी घोषणा केली होती. अर्थसंकल्प सादर करताना कपडे, फ्रोझन शिंपले, फ्रोझन स्क्विड, हिंग आणि कोको बीन्सवरील सीमाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून केंद्राने एसिटिक ऍसिड, कट आणि पॉलिश केलेले हिरे व सेल फोनसाठी कॅमेरा लेन्सवरील आयात शुल्क कमी केले. तसेच केंद्राने प्रयोगशाळेत बनलेले हिरे बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या बियाण्यांवरील मूलभूत सीमाशुल्कातही कपात केली.

कुणाला डोळा मारला? ; अजितदादांनी सभागृहात सर्वांसमोर सांगूनच टाकलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here