मंगळवारच्या बाजार सत्रात अदानी ग्रीन एनर्जीला मोठा झटका बसला असून, त्यानंतर आज अदानीचे शेअर्स कोसळले. मात्र, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने गौतम अदानी यांना दिलासा देत महसूल गुप्तचर संचालनालयाची याचिका फेटाळून लावली. पण या निर्णयाचा परिणाम मंगळवारी अदानींच्या शेअर्सवर दिसला नाही.
न्यायालयाचा दिलासा पण बाजारातून झटका
सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने अदानी पॉवरच्या दोन सहयोगी कंपन्यांविरुद्ध सीमा शुल्क विभागाचे अपील फेटाळून लावली, ज्यात कंपन्यांनी परदेशातून आयात केलेल्या भांडवली वस्तूंचा मोठ्या प्रमाणात अतिरेक केल्याचा आरोप करण्यात आला होता. विभागाने अदानी पॉवरने आयात केलेल्या भांडवली वस्तूंचे मूल्य वाढवले, असा आरोप केला. न्यायालयाने आरोप फेटाळून लावले आणि अदानींना दिलासा मिळाला असतानाच मार्केट एक्स्चेंजने दणका दिला. अदानी समूहाच्या दोन कंपन्यांवर अतिरिक्त देखरेख ठेवण्यात आली असून समूहाच्या दोन्ही कंपन्यांना एएसएम फ्रेमवर्कमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीएसई आणि एनएसईने या अदानी कंपन्यांना एएसएम फ्रेमवर्कमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गौतम अदानी यांच्या संपत्तीत आणखी बुडाली
एकावेळी जगातील तिसरे सर्वाधिक श्रीमंत असलेले गौतम अदानी आता अब्जाधीशांच्या टॉप-२० यादीतूनही बाहेर फेकले गेले आहेत. गौतम अदानींच्या संपत्ती त्यांच्या शेअर्सच्या वाढीचा सर्वाधिक वाटा होता, अशा परिस्थितीत स्टॉक्समधील पडझडीचा परिणाम त्यांच्या एकूण नेटवर्थवर झाला. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर इंडेक्सनुसार गौतम अदानींची एकूण संपत्ती ४ अब्ज डॉलरने घसरली असून स्वतः उद्योगपती देखील श्रीमंतांच्या यादीत ४६.३ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह आता २४व्या क्रमांकावर आहेत.
शेअर्सची आजची बिकट स्थिती
- मंगळवारी अदानी समूहाच्या १० पैकी १० शेअर्स तोंडघशी आपटले. दुपारी १२ वाजता अदानी एंटरप्रायझेसचे शेअर ७.०७ टक्के घसरून १६०१.४० रुपयांवर कोसळला.
- अदानी पोर्टचे शेअर्स ६.९०% घसरून ५९०.८० रुपयांवर आले.
- अदानी पॉवर लिमिटेडचा स्टॉक आज ५% टक्क्यांसह १७३.८५ रुपयांवर घसरला
- अदानी ट्रान्समिशनचा शेअर पाच टक्क्यांनी १०१५.७५ रुपयांवर खाली आला.
- अदानी ग्रीन एनर्जीचा शेअरही ५% घसरून ९३५.५० रुपयांवर आला.
- अदानी टोटल गॅसचा शेअर ५ टक्क्यांनी घसरून ९१०.४५ रुपयांवर आला.
- अदानी विल्मारचा शेअर ४.६४ टक्क्यांनी घसरून ३६९.६५ रुपयांवर आला.
- एसीसी सिमेंटचा शेअर आज ४.३८% कमजोर होऊन १६११ रुपयांवर पोहोचला.
- अंबुजा सिमेंटचा शेअर २.०७% घसरून ३६२.१० रुपयांवर आपटला.
- NDTV शेअर्स ४.९९ टक्के घसरणीसह १७४.३५ रुपयांवर व्यवहार करत आहेत.
देशातील दोन बड्या उद्योगपतींच्या ठाकरे-शिंदेंसोबत भेटीगाठी