रांची: झारखंडमध्ये विडी मजुराच्या बँक खात्यात १ लाख रुपये आले. मजुराचा आधार नंबर चुकून एका महिलेच्या एका बँक खात्याशी लिंक झाला होता. मजूर बँक खात्यातून पैसे काढून खर्च करत होता. २ वर्षांत त्यानं १ लाखाहून अधिक रक्कम काढली. महिलेला याबद्दल समजताच तिनं याबद्दलची तक्रार बँक व्यवस्थापकाकडे केली. विडी मजूर असलेल्या ४२ वर्षीय जीतराय सामंत यांना २४ मार्चला पोलिसांनी अटक केली. खात्यातून पैसे का काढले, याबद्दल सामंत यांना विचारणा करण्यात आली. ‘मला वाटलं पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या खात्यात पैसे पाठवत आहेत. आता मी ते पैसे परत करू शकत नाही. मी आर्थिकदृष्ट्या तितका सक्षम नाही,’ असं सामंत तुरुंगात जाताना म्हणाले.
अग्निवीर होण्यासाठी निघालेल्या तरुणावर पोलिसांनी ३ गोळ्या झाडल्या; कुटुंब म्हणतं, हा तर…
झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात ही घटना घडली. बँक कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणे जीतराय सामंत यांचं आधार कार्ड एका महिलेच्या खात्यासोबत लिंक झालं. जीतराय कॉमन सर्व्हिस सेंटरला गेले. आपल्या आधारला लिंक असलेल्या खात्यात पैसे असल्याचं त्यांना समजलं. त्यानंतर सामंत या खात्यातून पैसे काढू लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक बँक कर्मचारी या मजुराला पैसे काढण्यात मदत करत होता.
पोलिसांचा २४ तास बंदोबस्त, ६४ लाख खर्च; झाडाला VIP सुरक्षा, पान तोडल्यास शिक्षा; कारण काय?
ज्या महिलेच्या खात्याला सामंत यांचं आधार कार्ड लिंक झालं होतं, तिचं नाव लागुरी आहे. आपल्या खात्यातून हळूहळू पैसे गायब होत असल्याचं तिच्या लक्षात आलं. गेल्या सप्टेंबरमध्ये तिनं झारखंड राज्य ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकांकडे याबद्दल तक्रार केली. व्यवस्थापकांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून या प्रकरणाचा तपास करण्यास सांगितलं. यानंतर अधिकाऱ्यांनी शोध घेतला आणि सामंत यांना पैसे परत करण्याचे आदेश दिले. सामंत पैसे देण्यास असमर्थ होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.

सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्सटॉर्शनला बळी पडला असाल तर काय कराल?

बँक अधिकारी आपल्याला मानसिक त्रास देत आहेत. माझ्याविरोधातील एफआयआर रद्द करण्यात यावा, अशी मागणी सामंत यांनी पोलीस अधीक्षकांकडे पत्र लिहून केली. ‘करोनाची पहिली लाट आल्यावर देशात लॉकडाऊन लागू झाला. त्यावेळी पंतप्रधान मोदी बँक खात्यात पैसे जमा करत असल्याची चर्चा होती. त्यामुळे मी बँक खात्यातील पैशांची माहिती घ्यायला बँकेत गेलो. त्यावेळी खात्यात १ लाख असल्याचं मला समजलं. त्यानंतर मी २-४ महिन्यांमध्ये गरजेनुसार पैसे काढले,’ असं सामंत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here