म. टा. प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील खराब रस्त्याला जबाबदार धरत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याकडून तडकाफडकी पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांना रस्त्याबाबत आलेल्या अनुभवानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आली.कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. गेल्या काही वर्षात निधी मोठ्या प्रमाणात आला. पण त्यामधून दर्जेदार रस्ते होत नसल्याच्या तक्रारी होत्या. खासदार शिंदे दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात आले होते. त्यांनी शहरातील विविध भागांची पाहणी केली. तेव्हा रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट असल्याचे जाणवले.

त्यांनी तातडीने राज्याच्या नगर विकास खात्याचे प्रधान सचिवांना फोन करून याची माहिती दिली. आपण यामध्ये लक्ष घाला, गरज असेल तर अधिकाऱ्यांनाही बदला अशी मागणीही त्यांनी केली. त्यानुसार तातडीने शहर अभियंता सरनोबत यांच्याकडून कार्यभार काढून घेण्यात आला. जल अभियंता हर्ष जीत घाटगे यांच्याकडे या पदाचा कार्यभार देण्यात आला आहे.

आक्रस्ताळेपणा अंगलट, गुणरत्न सदावर्तेंना दणका, पुढील २ वर्षे वकिली करता येणार नाही!
खासदारांनी तक्रार केल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांवर तडकाफडकी कारवाई झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राला रस्त्याचा खराब अनुभव आल्यावर शहर अभियंत्याकडून पदाचा कार्यभार काढून घेतला गेला पण सामान्यांच्या तक्रारीनंतर खरंच अशी लगोलग कारवाई झाली असती का? असा प्रश्नही शहरात चर्चिला जातोय.

सावरकरांना माफीवीर म्हणू नका, पवारांनी राहुल गांधींना खडसावलं, हायव्होल्टेज बैठकीत काय झालं? वाचा…

देवेंद्रजी, कुणाला फोडायचं त्याला फोडा पण मनसेची माणसं फोडायचं पाप करु नका : बाळा नांदगावकर

दरम्यान, कोल्हापूर महापालिकेत रिक्त असलेल्या कार्यकारी अभियंता या पदावर आजच महेंद्र क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते जिल्हा परिषदेत बांधकाम विभागात अधिकारी होते. सरनोबत यांच्या पदावर क्षीरसागर यांना नियुक्त करण्यात आलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here