काँग्रेस सूत्रांच्या माहितीनुसार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याबाबत विचार सुरु आहे. लोकसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव ३ एप्रिल रोजी आणला जाण्याची शक्यता आहे.
अविश्वास प्रस्ताव आणायचा असल्यास ५० खासदारांचं समर्थन आवश्यक असतं. काँग्रेस आणि विरोधकांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ आहे. मात्र, अविश्वास प्रस्ताव आणायचा असल्यास लोकसभेचं कामकाज सुरु होण्याची गरज आहे. सध्याच्या स्थितीत लोकसभेचं कामकाज सुरळीत होण्याची शक्यता कमी आहे.
आपली लढाई मोदींविरोधात : संजय राऊत
खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली असून आपली लढाई ही सावरकरांविरोधात नसून ती नरेंद्र मोदी यांच्या विरोधात असल्याचं राहुल गांधींना सांगितल्याचं म्हटलं.
राहुल गांधी यांनी लोकसभा सचिव डॉ. मोहित रंजन यांना लेखी उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रात ‘१२ तुघलक लेनमधील देण्यात आलेला बंगला सोडण्याबाबत पत्र मिळालं असून धन्यवाद’ असं म्हटलं. चार वेळा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर तिथं राहिलो आहे. इथल्या काही चांगल्या आठवणी लक्षात राहतील. कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता तुमचा आदेश मानून बंगला खाली करेन, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसनं देशभर विविध आंदोलनं करण्यास सुरुवात केली आहे.