मुंबई : मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांपैकी एकीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शीतल गादेकर (धुळे) आणि संगिता ढवरे (नवी मुंबई) अशा दोन महिला काल मंत्रालयासमोर आल्या आणि त्यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना तत्काळ थांबवले. मात्र, काही प्रमाणात त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. त्यामुळे दोघींनाही तत्काळ जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील एका महिलेची प्राणज्योत आज मालवली आहे. शीतल गादेकर असं सदर महिलेचं नाव आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की, चेहर्‍याला मास्क लावून आणि टॅक्सीत बसून शीतल गादेकर आणि संगिता ढवरे या दोघी सोमवारी मंत्रालयात आल्या होत्या. दोघीही वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. तरीही त्या एकाच कथित समाजसेवकाच्या संपर्कात होत्या. संगीता ढवरे या नवी मुंबईतून एका पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नी आहेत. सदर पोलीस कॉन्स्टेबलचा पाय एका शस्त्रक्रियेदरम्यान निकामी झाला. त्या डॉक्टरविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशी त्याची मागणी होती. तर शीतल गादेकर या धुळ्यातील असून, त्यांच्या पतीच्या निधनानंतर, पतीच्या मित्राने जमीन बळकावली, याबाबत कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती. आज गादेकर यांचा मृत्यू झाला.

शिरसाटांच्या वादग्रस्त वक्तव्याची लगोलग चौकशी करा, ४८ तासांत अहवाल द्या, चाकणकरांचे पोलिसांना आदेश

दरम्यान, या दोन्ही महिला वेगवेगळ्या ठिकाणच्या असताना एकाच कथित समाजसेवकाच्या संपर्कात होत्या. त्यानेच या दोन्ही महिलांना मंत्रालयासमोर जाऊन विषप्राशन करा, त्यानंतर तुमच्या मागण्या पूर्ण होतील, असा विचित्र सल्ला दिला होता. त्यामुळे पोलीस या कथित समाजसेवकाबद्दल अधिक माहिती घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here