मेक्सिकोतील नॅशनल मायग्रेशन इन्स्टिट्यूटनं एक अधिकृत पत्रक काढत भूमिका स्पष्ट केली आहे. या केंद्रात ७१ प्रवाशांना ठेवण्यासाठी आणण्यात आलं होतं. सिउडाड जुआरेजच्या केंद्रात मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील ६८ प्रवासी होते. त्यापैकी २९ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रुग्णालयामध्ये ३९ जणांचे मृतदेह ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही दशकांमधील आगीची सर्वात मोठी घटना असल्याचं सांगतण्यात येतं. व्हेनेझुएलाच नागरिक वियांगले इन्फान्टे त्यांच्या पतीची वाट पाहत होत्या. त्याचवेळी केंद्रातून धूर येऊ लागला. रात्री १० च्या सुमारस आग लागली. मृतांमध्ये ग्वाटेमाला आणि होंडुरासच्या प्रवाशांचा समावेश आहे.
सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार
मेक्सिकोच्या गृह मंत्रालयाकडून या घटनेबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. आग नेमक्या कोणत्या कारणानं लागली हे समोर आलेलं नाही. मेक्सिकोत या घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे.मेक्सिकोतून अमेरिकेत येणाऱ्या प्रवासी नागरिकांसाठी सिउडाड जुआरेज हे महत्त्वाचं ठिकाण आहे. तिथूनचं दुसऱ्या देशातून येणारे प्रवासी अमेरिकेत प्रवास करतात.