मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची आत्महत्या व त्या प्रकरणाच्या चौकशीचा संबंध मुंबईच्या सुरक्षिततेशी जोडणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना अभिनेत्री यांनी खडे बोल सुनावले आहेत. ‘सुशांतच्या दु:खद मृत्यूचं राजकारण करून नका,’ अशी विनंती रेणुका शहाणे यांनी केली आहे.

सुशांतसिंहच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष भाजपसह काही मंडळी करत आहेत. तर, मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यास सक्षम आहेत, असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सोमवारी मुंबईत आलेल्या बिहारी पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाइन केल्यामुळं आरोप-प्रत्यारोपाला जोर चढला आहे. महाराष्ट्र सरकार नेमकं काय लपवतंय, असा सवाल भाजपनं केला होता. यांनी या संपूर्ण प्रकरणावर काल ट्वीट केलं होतं.

वाचा:

‘सुशांतसिंहच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीनं केला जात आहे, हे पाहता मुंबईनं माणुसकी गमावल्यासारखं वाटतंय. निष्पाप व स्वाभिमानानं जगणाऱ्या नागरिकांसाठी मुंबई सुरक्षित राहिली नसल्याचं अमृता यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं. अमृता यांच्या या मुंबईवरील टीकेला रेणुका शहाणेंनी ट्वीटच्याच माध्यमातून उत्तर दिलंय. ‘सुशांतच्या दुर्दैवी मृत्यूचं राजकारण करू नका. या घटनेचा वापर करून विनाकारण मुंबई व मुंबईकरांची निंदा करू नका. त्याऐवजी तुमच्याकडं खरंच काही खात्रीशीर माहिती असेल तर मुंबई पोलिसांना देऊन त्यांना तपासकामात मदत करा. तेवढे अधिकार तुम्हाला आहेत,’ असं रेणुका शहाणे यांनी म्हटलं आहे.

अमृता फडणवीसांची बाजू घेऊन ट्रोल करणाऱ्यांनाही रेणुका शहाणे यांनी उत्तर दिलंय. ‘अमृता या मिसेस मुख्यमंत्री असत्या तर मुंबईबद्दल त्यांनी कोणत्याही परिस्थितीत असं वक्तव्य केलं नसतं. एल्फिन्स्टन पूल फडणवीसांच्याच काळात कोसळला होता. त्यात अनेक मुंबईकरांचे जीव गेले. तेव्हा मुंबई असुरक्षित किंवा संवेदनाहीन असल्याचं अमृता कधी म्हणाल्या नव्हत्या,’ याची आठवणही त्यांनी दिली आहे.

आणखी वाचा:

वाचा: वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here