बीड : बीडमध्ये झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तालुक्यातील गडी माजलगाव हायवेवर काल सकाळी अर्धमसला शिवारात रूई येथे हा अपघात झाला होता. अपघातानंतर स्थानिकांनी युवकाला तात्काळ गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं, मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.याविषयी अधिक माहिती अशी की, कृष्णा विठ्ठल गायकवाड (वय वर्ष २७, राहणार रूई तालुका गेवराई जिल्हा बीड) असे मयत तरुणाचे नाव आहे. हा तरुण छत्रपती संभाजीनगरला एका खाजगी कंपनीत काम करत असल्याची देखील माहिती समोर येत आहे. तो आपल्या मोटरसायकलवरुन बीडला परीक्षा देण्यासाठी जात होता. अर्ध्या रस्त्यातच अर्धमसला शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा अपघात झाला.

दरम्यान हा अपघात झाल्याचं इतर नागरिकांना लक्षात येतात नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला तात्काळ गेवराई जिल्हा रुग्णालयात नेलं, मात्र तोपर्यंत तरुणाने अखेरचा श्वास घेतला होता. या घटनेमुळे रुई गावात शोककळा पसरली आहे.

चिंगीला टेडीसारखी आंघोळ घालूया, दोन चिमुकल्या बहिणींचा अट्टाहास, पाण्यात बुडून बाळाचा अंत
जिल्हा रुग्णालयात युवकाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. रूई गावात त्याच्या पार्थिवावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुंबई- पुणे प्रवास महागणार; एक्स्प्रेस वेवरील टोलध्ये मोठी वाढ, ट्रॅव्हल्सवाल्यांचा संताप

मयत कृष्णा गायकवाड अभ्यासात अत्यंत हुशार असायचा. परीक्षांमध्ये तो नेहमी अव्वल असायचा, असं त्याच्या मित्रमंडळींनी सांगितलं. कृष्णाच्या अकस्मात निधनाने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मित्र परिवारासह संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे.

निर्जनस्थळी प्रियकराशी शरीरसंबंध, अतिरक्तस्रावाने प्रेयसीचा मृत्यू; १८ वर्षीय तरुण अटकेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here