क्रूड ऑइलचा आजचा दर
जागतिक बाजारात आज कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ब्रेंट क्रूड ऑइल आज ०.५७ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $७९.१० च्या आसपास व्यवहार करत आहे. तर WTI क्रूड ऑइल प्रति बॅरल ०.८२ टक्के वाढीसह प्रति बॅरल ७३.८० डॉलरच्या आसपास पोहोचले आहेत. दरम्यान, या दर वाढीनंतरही दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चारही महानगरांमध्ये किमती स्थिर असून दरांमध्ये कोणताही बदल दिसून आलेला नाही.
कोणत्या शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले
दिल्लीच्या जवळच्या नोएडा, हरियाणा येथील गुरुग्राम, जयपूर, लखनऊ आणि पाटणा येथे वाहन इंधनाच्या दरात आज किंचित उलटफेर पाहायला मिळत आहे. इंडियन ऑईलच्या नवीन दर यादीनुसार राष्ट्रीय पातळीवर राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये सर्वात महाग तर सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये उपलब्ध आहे. श्रीगंगा नगरमध्ये एक लिटर पेट्रोल ११३.४८ रुपये, तर डिझेलचा भाव ९८.२४ रुपये प्रति लिटर आहे. याउलट पोर्ट ब्लेअरमध्ये अजूनही पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये दराने विकले जात आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किंमती कधी कमी होणार?
गेल्या वर्षी एप्रिल २०२२ मध्ये अखेर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सुधारित करण्यात आल्या होत्या, तर केंद्र सरकारने २१ मे २०२२ रोजी इंधनावरील उत्पादन शुल्क कपात केली केली. तेव्हापासून राष्ट्रीय पातळीवर वाहन इंधनाचे दर ‘जैसे थे’ आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे क्रूडचा भाव विक्रमी पातळीवर पोहोचल्यानंतर मागील काही महिन्यांपासून त्यात लक्षणीय घट झाली, ज्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या महाग दरात दिलासा मिळण्याच्या सामान्य नागरिकांच्या आशा उंचावल्या. मात्र, पुन्हा एकदा क्रूडच्या किमती वाढत असल्यामुळे वर्षभरानंतर पेट्रोल-डिझेलचा भाव वाढणार का? अशी चिंता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.
१७ रुपयांनी डिझेल स्वस्त होऊ शकलं असतं, दर फक्त कमी करायचे म्हणून केले | अजित पवार