मिशी ही पुरुषार्थाचे प्रतिक असल्याचे संभाजी भिडे मानतात. त्यांनी या विषयावर भाष्य करताना अयोध्येत राम मंदिरातील मूर्तीला मिशी लावली जावी ही मागणी केली आहे. मूर्तीला मिशी न लावणे ही मूर्तीकारांची चूक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जर मंदिरात देवाला मिशी नसेल तर अशा मंदिरांमध्ये माझ्यासारखा हिंदू जाणार नाही, असेही संभाजी भिडे म्हणाले होते. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी संभाजी भिडे यांचा समाचार घेत त्यांचा उल्लेख अज्ञानी असा केला आहे.
वाचा:
काही ठिकाणी भगवान शीवाला मिशा दाखवलेल्या असतात. मात्र देव चीरतरुण असतात असे म्हटले जाते. मात्र, संभाजी भिडे यांची धारणा या मान्यतेच्या विरोधात असल्याचे हिंदू धर्माचे जाणकार म्हणत आहेत.
वाचा:
प्रभू राम, भगवान कृष्ण आणि भगवान शीव हे हिंदू धर्मातील अतिशय प्रतिद्ध अशा देव आहेत. या तिन्ही देवांना कधीही दाढी किंवा मिशी दाखवलेली नाही. याचे कारण म्हणजे या तिन्ही देवाना षोडशवर्षीय दाखवण्यात आले आहे, असे सत्येंद्र दास यांचे म्हणणे आहे. षोडशवर्षीय म्हणजे १६ वर्षीय. हे देव जो पर्यंत पृथ्वीर राहतील तो पर्यंत ते कायम १६ वर्षीयच राहणार आहेत. ब्रम्हा या देवतेला मात्र ५ मुख आहेत आणि या देवतेला दाढी आणि मिशा दाखवलेल्या आहेत. याचे कारण म्हणजे ब्रह्माचे आयुष्य मर्यादित आहे. मात्र रामाची नेहमीच तरुण अवस्थेतच पूजा केली जाते, असेही सत्येंद्र दास पुढे म्हणाले.
ही बातमी देखील वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times