How To Download Marriage Certificate In Digilocker: आता मुंबईकरांना डिजी लॉकरमध्ये लग्नाचे प्रमाणपत्र जतन करुन ठेवता येणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने ही खास सुविधा आणली आहे.

 

digilocker
मुंबई: मुंबई महापालिकेने मुंबईकरांच्या सेवेमध्ये आणखी एक ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचा उपक्रम असलेल्या ‘डिजिलॉकर’ या ऑनलाइन शासकीय कागदपत्रांच्या अॅपमध्ये आता मुंबईकरांना विवाह नोंदणी प्रमाणपत्रही जतन करता येईल. २८ जानेवारी, २०१६नंतर विवाह नोंदणी केलेल्यांना ही सुविधा मिळणार आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्र हा विवाहितांसाठी महत्त्वाचा वैयक्तिक दस्तावेज समजला जातो. पासपोर्ट, व्हिसा आणि इतर अनेक शासकीय कामकाजांसाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्राची गरज भासते. पालिकेकडे सन २०१०पासून विवाह नोंदणी प्रमाणपत्रविषयक कामकाज सुरू झाले असले तरी जानेवारी, २०१६पासून विवाह नोंदणी प्रमाणपत्रांचे कामकाज ऑनलाइन करण्यात आले.

आता पालिकेकडून विवाह नोंदणी प्रमाणपत्र डिजिलॉकरमध्ये देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्रत्यक्ष बाळगण्याची गरज भासणार नाही. विवाहाचे वर्ष कोणतेही असले तरी ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर हे प्रमाणपत्र उपलब्ध होते, हे लक्षात घेणे आवश्यक असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. मुंबई पालिकेकडे वैवाहिक नोंदणीची संख्या तीन लाख ८० हजार ४९४ इतकी आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या हस्ते या सुविधेचे लोकार्पण करण्यात आले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here