शेअर बाजाराची संमिश्र सुरुवात
मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स ४१.६४ अंक घसरून ५७,५७२.०८ अंकांच्या पातळीवर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ५० शेअर्सचा निर्देशांक एनएसई निफ्टी २५.६० अंक किंवा ०.१५ टक्के घसरणीसह १६,९७७.३० वर खुला झाला. आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील ३० पैकी २४ समभाग तेजीसह वाटचाल करताना एनएसई निफ्टीच्या ५० पैकी ३९ शेअर्समध्ये वाढीसह व्यवहार होताना दिसत आहे. याशिवाय १० समभाग घसरणीसह तर एक स्टॉक अपरिवर्तित व्यवहार करत आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवसाय दिसून येत असून जपानचा निक्केई आणि तैवान तसेच दक्षिण कोरियाचा कोप्सी देखील किरकोळ तेजीने व्यवहार करत आहेत.
सेन्सेक्सचे क्षेत्रीय निर्देशांक
आजच्या व्यवहाराच्या सुरुवातीच्या सत्रात एनएसई निफ्टीच्या सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीस चिन्ह दाखवत आहेत. तेल आणि वायू समभागांमध्ये आज केवळ घसरण होत असताना बँक, मेटल, ऑटो, फार्मा, मीडिया, हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल्स, आयटी समभाग तेजीची नोंद करत आहेत.
अदानी समूहाच्या शेअर्सची वाटचाल
बाजाराच्या सुरुवातीच्या सत्रात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये संमिश्र कल दिसून आला. अदानी पॉवर ४%, अदानी विल्मर २.६९% आणि अदानी ग्रीन पाच टक्क्यांनी कोसळले. तर अदानी पोर्ट आणि अदानी एंटरप्रायझेसने १ टक्क्यांची किंचित वाढ नोंदवली. तसेच अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशनमध्ये ५-५% घसरणीने व्यवहार होत असताना अंबुजा सिमेंट आणि एनडीटीव्ही हिरव्या व ACC शेअर्सवर लाल रंगात व्यवहार सुरु आहे.
कोणत्या शेअर्समध्ये उसळी
सेन्सक्स निर्देशांकातील एम अँड एम, HUL, टाटा मोटर्स, HCL टेक, बजाज फिनसर्व, HDFC बँक, अल्ट्राटेक सिमेंट, भरती एअरटेल, HDFC, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, सन फार्म, नेस्ले, एल अँड टी, आयटीसी, NTPC, पॉवरग्रीड, मारुती सुझुकी, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स, टायटन, विप्रो, एसबीआय, आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स वाढीसह हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत.