रायगड/अलिबाग : रायगड जिल्ह्यात पेण खोपोली मार्गावर काल झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. टेम्पो आणि बाईकच्या अपघातात दुचाकीस्वार मनोज पाटील याने प्राण गमावले, तर कार आणि स्कूटीच्या अपघातात संदीप शिर्के या तरुणावर काळाने घाला घातला आहे.मंगळवार २८ मार्चचा दिवस पेण – खोपोली मार्गावरील अपघातवार ठरला. या मार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

काल सकाळी सात वाजताच्या सुमारास कल्पेश करंबत (रा. नवखार – अलिबाग) हा टेम्पो क्रमांक एम.एच ०६ बी.डब्ल्यु ०५७९ घेऊन पेण खोपोली रोडने भरधाव वेगात जात होता. यावेळी गागोदे गावच्या हद्दीत दुचाकी क्रमांक एम.एच ०६ बी.झेड. ८४४३ वरून येणारा मनोज शांताराम पाटील (वय – ३७ वर्षे रा. कमळपाडा, पो. शहाबाज, अलिबाग) यांची समोरासमोर जोरदार टक्कर झाली.

या अपघातात दुचाकीस्वार मनोज पाटील या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मनोज हा कामानिमित्त खोपोलीतील इमॅजिका वॉटरपार्कमध्ये जात होता. मात्र रस्त्यातच त्याला काळाने गाठले. यावेळी अँब्युलन्स चालक राजेश जाधव यांनी व स्थानिक ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत तात्काळ मदतकार्य केले.

गर्लफ्रेण्ड आणि दोन मित्रांसह ओयो रुम बूक, आधी केक कापला मग तिथेच जीवन संपवलं
याच मार्गावर दुसऱ्या घटनेत सावरसई गावच्या हद्दीत राजू पिचिका सीएनजी पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर अपघाताची घटना घडली. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अजय पेटारे, रा. झिराडपाडा – अलिबाग हा व्हेन्टो कार क्रमांक एम.एच ०४ एफ.आर.९७६३ घेऊन जात असताना चुकीच्या बाजूला गाडी जाऊन समोरुन येणाऱ्या स्कुटी क्रमांक एम.एच ०६ सी.एफ.३३२६ ला तिने समोरुन ठोकर दिली.

चालक उतरताच टेम्पोत जाऊन बसला अन् रिव्हर्स गियर टाकला, टेम्पो थेट विहिरीत !

या अपघातात स्कूटी चालक संदीप सुरेश शिर्के (रा. पाडले, पो. सावरसई – पेण) याला गंभीर दुखापती होऊन त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समद बेग करीत आहेत.
निर्जनस्थळी प्रियकराशी शरीरसंबंध, अतिरक्तस्रावाने प्रेयसीचा मृत्यू; १८ वर्षीय तरुण अटकेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here