डोंबिवली : रिक्षा चालकांच्या वाढत्या दादागिरीचा फटका ठाणे जिल्ह्यातील प्रवाशाला बसला. वाढलेल्या भाड्याबाबत विचारले असता रिक्षा चालकाने प्रवाशाला बांबूने मारल्याची घटना डोंबिवली शहरातील इंदिरा चौक परिसरात घडली. या संदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डोंबिवली हे चाकरमान्यांचे शहर आहे. त्यामुळे येथे कायमच रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर चाकरमानी घरी जाण्यासाठी रिक्षाचा वापर करतात. कल्याणला राहणारे गणेश तांबे हे काल रात्री अकरा वाजताच्या सुमारास आपल्या घराकडे जायला निघाले होते. यावेळी तांबेंनी डोंबिवलीतील इंदिरा चौकात जाऊन टाटा पॉवरपर्यंत शेअर रिक्षाने जाण्याचे ठरविले.
रिक्षेपर्यंत गेल्यानंतर भाडे किती घेणार असा प्रश्न रिक्षा चालकाला त्यांनी विचारला. यावेळी रिक्षा चालकाने वाढवून भाडे सांगितल्याने त्यांनी इतके भाडे होत नाही असे रिक्षा चालकाला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर चिडलेल्या रिक्षावाल्यांनी त्यांना रिक्षेतील बांबू काढून मारल्याची घटना घडली आहे.

या मारहाणीत तांबे जखमी झाले असून त्यांच्यावर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले. मात्र रिक्षावाल्यांची ही वाढती दादागिरी पाहून डोंबिवलीतील सर्वच प्रवासी घाबरले आहेत. रिक्षावाल्यांची दादागिरी वाढल्याची चर्चा संपूर्ण शहरभर रंगली आहे.
या आधी देखील महिला पत्रकारांना रिक्षा चालकांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली होती. मात्र वाहतूक पोलिस आणि आरटीओचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास रामनगर पोलीस करत आहेत.
पाहा व्हिडिओ :