नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वीच लोकसभा सचिवालयाने त्यांच्या अपात्रतेचा आदेश मागे घेतला.लक्षद्वीप लोकसभा खासदार मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या मोहम्मद फैजल यांचे सदस्यत्न रद्द करण्यात आले होते. मात्र त्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीपूर्वीच लोकसभा सचिवालयाने त्यांच्या अपात्रतेचा आदेश मागे घेतला आहे. त्यामुळे फैजल यांना पुन्हा खासदारकी बहाल झाली आहे.

हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी फैजल यांना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर फैजल यांना अपात्र ठरवण्यात आले होते. परंतु केरळ उच्च न्यायालयाने २५ जानेवारी रोजी त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली.

लोकसभेच्या सचिवालयाने १३ जानेवारी रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कावरट्टी येथील सत्र न्यायालयाने हत्येच्या प्रयत्नाच्या खटल्यात दोषी ठरवल्याच्या तारखेपासून (११ जानेवारी २०२३) फैजलला यांना लोकसभेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरवण्यात आले.

बाळासाहेब-वाजपेयींना मैदान भरलं नाही, मी सात लाखांची गर्दी जमवली, तानाजी सावंतांची आत्मस्तुती
घड्याळावर ज्याने महाराष्ट्राबाहेर निवडून येऊन दाखवलं तो शरद पवारांचा एकमेव खासदार गोत्यात अडकला होता. शरद पवारांच्या अत्यंत जवळच्या असलेल्या या सहकाऱ्याने लोकसभेत विविध प्रश्नांवर आग्रही भूमिका मांडली आहे. मात्र या एका प्रकरणानंतर या खासदाराला कोर्टाने १० वर्षांची शिक्षा आणि एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता.

माझ्या हृदयात शरद पवार; म्हणत राष्ट्रवादीचे संजय पवार पुन्हा शिंदे गटाच्या मंचावर; जिल्ह्यात चर्चांना उधाण

अॅडव्होकेट केआर शशिप्रभू यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या याचिकेत फैजल यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते की, उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली असतानाही लोकसभा सचिवालय अधिसूचना मागे घेत नाहीये.
तानाजी सावंतांनाही एक डॉक्टरेट द्या, राऊतांनी एका दगडात दोन पक्षी मारले, मंत्र्याची लायकीच काढली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here