MCX वर सोन्याचा आजचा भाव
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. आज सोन्याचा भाव ५८,९१८ रुपये प्रति १० ग्रॅम दरावर उघडला आणि सध्या ९५ रुपये किंवा ०.१६ टक्के किंचित घसरणीसह ५८ हजार ९४७ रुपये प्रति १० ग्रॅमवर ट्रेड करत आहे. आजच्या व्यवहार सत्रात सोन्याचा दर ५९,०३२ रुपये इतका वाढला तर ५८ हजार ८७० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत खाली घसरला होता.
MCX वर चांदीची किंमत
एमसीएक्सवर आज चांदीच्या दृष्टी घसरणीने व्यवहार होत आहे. सध्या चांदीची किंमत ७०,५२८ रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत असून आज त्यात प्रति किलो ५६ रुपयांची किरकोळ घसरण दिसून आली. आज चांदीचा भाव रु. ७०,४४४ वर उघडला तर आतापर्यंत ७०,३९२ रुपयांची नीचांकी तर ७०,५५ रुपयांची सर्वोच्च पातळी पाहिली. लक्षात घ्या की चांदीच्या या किमती मे फ्युचर्ससाठी आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे दररोज बदलतात त्यामुळे मौल्यवान धातूंची खरेदी करण्यापूर्वी ताजा भाव माहिती असणे आवश्यक आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड ०.३७% घसरून $१,९६६.५० प्रति औंस आणि चांदीचा भाव ०.१६ टक्के घसरून $२३.३७ प्रति औंस झाला आहे.
स्पॉट गोल्डच्या दरात तेजी
मुंबई : २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत २२० रुपयांनी वाढून ५९,६७० रुपयात उपलब्ध आहे
दिल्ली : २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या किमतीत २२० रुपयांची वाढ होऊन ५९,८२० रुपयांना विकले जात आहे.
कोलकाता : २४ कॅरेटचे १० ग्रॅम सोन्याची विक्री २२० रुपयांच्या उसळीसह ५९,६७० रुपयांत होत आहे