बीड : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या कारखेल बुद्रुक येथील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीने चक्क सुसाईट नोट लिहून आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. या घटनेनं संपूर्ण गावासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिक्षा बाबासाहेब शेलार असं या मुलीचं नाव आहे.

बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथे दिक्षा लहानपणापासून आपल्या मामांकडे राहत होती. तिचे आई-वडील हे ऊसतोड कामगार असल्याने मामा आणि आजोबा तिचा संभाळ करत होते. काल घरातील सर्वजण शेतात गेले असताना दिक्षा घरी एकटीच होती. दिक्षाने सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

Girish Bapat Death: भाजप खासदार गिरीश बापट यांचं पुण्यात निधन
सायंकाळी सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान आजोबा आणि मामा हे घरी परतल्यानंतर दिक्षाचा ओढणीला लटकलेला मृतदेह पाहून घरातील सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर पोलिसांना तात्काळ या घटनेची माहिती देण्यात आली. आष्टी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, दिक्षाने आत्महत्या करण्याआधी एक सुसाईट नोट लिहिली होती.

या सुसाईट नोटमध्ये “मला आयपीएस व्हायचं होतं. मात्र, आता सगळं संपलंय… ताईला घेऊन जा तुमच्यासोबत कारखेलला, मी चालले आहे…”, असं लिहिलेली सुसाईट नोट पोलिसांना तिच्याजवळ सापडली. तिने लिहिलेल्या सुसाईटमध्ये “आता सगळं संपलं”, याचा नेमका अर्थ काय? याचा शोध देखील घेणार असल्याचं पोलिसांनी यावेळी सांगितलं आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून पुन्हा नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर आष्टी तालुक्यासह अख्या जिल्हाभरात आयपीएस होण्याची इच्छा ठेवणाऱ्या १३ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्यानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

शरद पवारांना मोठा दिलासा, राष्ट्रवादीच्या नेत्याची रद्द केलेली खासदारकी पुन्हा बहाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here