यूपीआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या काही वर्षांत ऑनलाईन व्यवहारांचं प्रमाण अनेक पटींनी वाढलं आहे. त्यामुळे सायबर चोरटे लोकांना गंडवण्यासाठी नवेनवे मार्ग शोधून काढत आहेत.

 

upi
मुंबई: यूपीआयमुळे आर्थिक व्यवहार सोपे झाले. गेल्या काही वर्षांत यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांचं प्रमाण कैकपटीनं वाढलं. त्यामुळे अनेकांनी रोकड बाळगणं सोडून दिलं. बिल, शॉपिंग, तिकीट बुकिंगसाठी यूपीआयचा सर्रास वापर होऊ लागला. यूपीआयमुळे सुट्ट्या पैशांची चिंता मिटली. रोकड चोरी होण्याचा धोका कमी झाला. मात्र सायबर क्राईमसारख्या घटना वाढल्या. चोरट्यांनी नव्या क्लृप्त्या शोधून काढत यूपीआय वापरकर्त्यांना गंडवण्यास सुरुवात केली.सायबर फ्रॉड करणाऱ्यांनी गंडवण्याची पद्धत शोधली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांत सायबर फ्रॉडच्या एकसारख्या घटना घडल्या आहेत. ग्राहकांमध्ये कमी असणारी जागरुकता आणि त्यांच्या हातून होणाऱ्या चुका यांचा गैरफायदा घेत ८१ जणांना १ कोटी रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. चुकून पेमेंट झाल्याचा दावा करत चोरटे ग्राहकांची फसवणूक करतात आणि त्यांना लाखोंचा गंडा घालतात.
सीफेसवर CEOचा अपघाती मृत्यू; २० फूट दूर फेकल्या गेल्या; RTOच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय?
गलती से मिस्टेक! चुना लावण्याची नवी पद्धत
सायबर चोरटे आधी यूपीआयच्या माध्यमातून लोकांच्या खात्यात काही पैसे पाठवतात. यानंतर संबंधित यूपीआय वापरकर्त्यांना फोन करतात. तुमच्या खात्यात चुकून पैसे आलेत. ते परत करा, अशी विनंती कॉलवर करतात. यानंतर यूपीआय वापरकर्त्यानं पैसे परत केल्सास त्याच्या बँक खात्याचे सारे तपशील, केवायसीशी संबंधित माहिती, आधार, पॅन कार्डचा तपशील चोरट्यांच्या हाती लागतो. यासाठी चोरटे एका मालवेअरचा वापर करतात. याच माहितीचा वापर करून चोरटे बँक खातं हॅक करू शकतात.
डोक्यात सारखं तेच! ग्रँटरोड हल्ल्यामागचं कारण अखेर उघड; चेतनच्या पत्नीनं सगळंच सांगितलं
जाणकार काय सांगतात?
सायबर गुन्हे तज्ज्ञ पवन दुग्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण प्रक्रिया मालवेयर फिशिंग आणि मानवी अभियांत्रिकीचं मिश्रण आहे. यामुळे कार्यरत असणारं अँटी मालव्हेअर यंत्रणा किंवा सॉफ्टवेअर अशा प्रकारची फसवणूक पकडू शकत नाही. सध्याच्या व्यवस्था या प्रकारचे गुन्हे रोखण्यात कमी पडतात. त्यामुळे सायबर फ्रॉड करणाऱ्यांचा फोन आल्यास त्याला व्यवस्थित उत्तरं देणं आपल्या हातात आहे. कोणत्याही अज्ञात नंबरवरून फोन आल्यास, त्यानं पैसे परत करण्याची विनंती केल्यास, मी माझ्या बँकेला याबद्दल सांगितलं आहे, असं उत्तर तु्म्ही देऊ शकता. कोणत्याही अज्ञात व्यक्तीला यूपीआयच्या माध्यमातून पैसे पाठवून त्याचा स्क्रिनशॉट पाठवणं टाळा.

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here