नवी दिल्ली : आजच्या वाढत्या महागाईच्या काळात रेल्वे प्रवासापासून दैनंदिन जीवन संदर्भातील सर्वच गोष्टी महागल्या आहेत. आणि विमानभाडेही याला अपवाद नाही. देशांतर्गत मार्गावरील तिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत की प्रवासी संख्येत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. अशा स्थितीत परदेशी मार्गावरील विमान तिकिटांचा विचारही करू नका. मात्र, या दरवाढीच्या काळात तुम्ही एका डॉलरपेक्षा कमी किमतीत परदेशात प्रवास करू शकता. व्हिएतनामची कमी किमतीची एअरलाइन, व्हिएतजेट एअरलाइनने भारतीयांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी प्रमोशनल ऑफर जाहीर केली आहे.

विमानाची खिडकी उघडा, मला गुटखा थुंकायचाय! प्रवाशाची अजब मागणी; एअर होस्टेसनं काय केलं?
व्हिएतजेटची भारतीय प्रवाशांसाठी खास ऑफर
भारतीय प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी व्हिएतजेटने जवळपास $० शून्य दराने २० लाख विमान तिकिटे देण्याची ऑफर दिली आहे. हो, या ऑफरवर कर आणि विमानतळ शुल्क स्वतंत्रपणे लागू होईल. या ऑफर अंतर्गत तिकिटांची विक्री काल म्हणजे २८ मार्चपासून सुरु झाली असून तुम्ही ४ एप्रिल २०२३ पर्यंत तिकीट बुक करून व्हिएतनाममध्ये तसेच ऑस्ट्रेलिया, भारत, जपान, दक्षिण कोरिया, तैवान, हाँगकाँग (चीन) आणि आशिया पॅसिफिकमधील सर्व मार्गांवर प्रवास करू शकता. अशा स्थितीत जर तुम्हालाही या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर www.vietjetair.com आणि VietJet Air मोबाईल ॲपवर बुकिंग करू शकतात.

विमान प्रवासात बाळाचा जन्म झाला; कुठल्या देशाचं मिळत नागरिकत्व, जाणून घ्या काय सांगतो नियम आणि कायदा
बिझनेस क्लासमध्ये ५०% सूट
वरील ऑफर व्यतिरिक्त एअरलाइन्सच्या बिझनेस क्लास स्कायबॉस बिझनेस आणि स्कायबॉसमधील प्रवाशांना ५०% सवलतीवर तिकीट देखील दिले जाणार असून यामध्ये कर आणि विमानतळ शुल्काचा समावेश नाही. म्हणजे त्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागतील. स्कायबॉस बिझनेस तिकिटे भारत आणि व्हिएतनामला जोडणाऱ्या कोणत्याही मार्गावर तसेच कनेक्टिंग सेवांवर फक्त २०० अमेरिकी डॉलरपासून तिकिटांची विक्री सुरू आहे. तर ही ऑफर ५ मे २०२३ पर्यंत वैध आहे. आणि १२ डिसेंबर २०२३ पर्यंत प्रवास करून या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

एअर इंडियाकडून प्रवाशांची फसवणूक, राजू शेट्टींची दावा, उड्डाणमंत्र्यांकडे तक्रार

दरम्यान, बिझनेस क्लासचे तिकीट खरेदी केल्या तुम्हाला अतिरिक्त सुविधांचाही फायदा मिळेल. यामध्ये लक्झरी लाउंज सुविधा, खाजगी केबिन, कॉकटेल बार, फ्लॅट बेड सीट्स, २० किलोपर्यंत मोफत कॅरी-ऑन बॅगेज आणि ६० किलो चेक-इन बॅगेज असे फायदे तुम्हाला बिझनेस क्लासचे तिकीट बुक केल्यास मिळेल. याशिवाय व्हिएतजेटच्या ऑफरद्वारे तुम्ही तिकीट बुकिंग करत असाल तर प्रवाशांना काही कोड वापरावे लागतील. तुम्ही www.vietjetair.com किंवा VietJet Air च्या मोबाईल ॲपवर बुकिंग करताना “ALL50SBB” आणि “ALL50SB” हा कोड प्रविष्ट केल्यावर तुम्हाला स्कायबॉस बिझनेस आणि स्कायबॉस क्लासमध्ये सूटचा लाभ मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here