कोल्हापूरः शिवाजी विद्यापीठातील ग्रंथालयात शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या कॅनमध्ये जिवंत बेडूक दिसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली.

विद्यापीठाच्या आर. ओ. प्लांटमधून येणाऱ्या २० लिटर क्षमतेच्या पाण्याच्या कॅनमध्ये बेडूक आढळला. विद्यापीठाने स्वतंत्रपणे शुद्ध पाणी यंत्रणा कार्यान्वित केली असून या यंत्रणेद्वारे विद्यापीठात सर्वत्र एकच पाणी पुरवले जाते. याच पाण्याच्या कॅनमध्ये बेडूक आढळल्याने विद्यार्थ्यांमध्येही संभ्रमावस्था निर्माण झाली. दरम्यान, तांत्रिकदृष्ट्या आर. ओ. प्लांटमध्ये ९० डिग्री अंशावर पाण्याचे शुद्धीकरण केले जात असून अत्यंत काटेकोरपणे पाण्याचे जार भरले जातात. त्यामुळे या प्रकरणी नेमकी शास्त्रीय चौकशी करण्याचे आदेश विद्यापीठ प्रशासनाने पर्यावरण शास्त्र विभागाला दिले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here