karnataka election 2023, कर्नाटक विधानसभेच्या लढाईचं बिगुल वाजलं! १० मे रोजी एकाच टप्प्यात मतदान, १३ तारखेला निकाल – karnataka election 2023 voting on may 10 results on 13th vote from home for elderly
बंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. कर्नाटकात विधानसभेच्या एकूण २२४ जागा आहेत. त्यासाठी एकाच टप्प्यात मतदान होईल. कर्नाटकात सध्या भाजपचं सरकार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसनं जनता दलासोबत (सेक्युलर) आघाडी केली. जनता दलाला मुख्यमंत्रिपद देण्यात आलं. मात्र हे सरकार अल्पकाळ टिकलं. त्यानंतर भाजपनं सरकार स्थापन केलं.विधानसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना १३ एप्रिलला जारी करण्यात येईल. इच्छुक उमेदवारांना २० एप्रिलपर्यंत अर्ज भरता येईल. २१ एप्रिलला उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. २४ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेता येऊ शकेल. राज्यात १० मे रोजी मतदान होईल. १३ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. Girish Bapat Death: भाजप खासदार गिरीश बापट यांचं पुण्यात निधन कर्नाटकात एकूण ५ कोटी २१ लाख ७३ हजार ५७९ मतदार आहेत. यातील नवमतदारांची संख्या ९ लाख १७ हजारांच्या घरात आहे. ८० पेक्षा अधिक वय असलेल्यांना या निवडणुकीत घरातून मतदान करण्यात येईल. १ एप्रिलला वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्यांनादेखील निवडणुकीत मतदान करता येईल. या निवडणुकीत २२४ मतदान केंद्रांवर तरुण कर्मचारी असतील. १०० केंद्रांवर दिव्यांग कर्मचारी तैनात असतील.
कर्नाटकात विधानसभेचे एकूण २२४ मतदारसंघ आहेत. मागील निवडणुकीत भाजपनं १०४, काँग्रेसनं ८०, तर जेडीएसनं ३७ जागा जिंकल्या. भाजपला सत्तेपासून दूर राखण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसनं निवडणूकोत्तर आघाडी केली. काँग्रेसनं जेडीएसला मुख्यमंत्रिपद दिलं. मात्र हे सरकार फार काळ टिकू शकलं नाही. काँग्रेस, जेडीएसच्या काही आमदारांनी राजीनामे दिले. त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. सध्या विधानसभेत भाजपचे ११७, काँग्रेसचे ६९, तर जेडीएसचे ३२ आमदार आहेत.