कल्पेश गोरडे, ठाणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या माजी अंगरक्षकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनंत करमुसे मारहाण प्रकरणावेळी आव्हाडांचे बॉडीगार्ड असलेल्या मुंबई सुरक्षा दलातील हवालदार वैभव कदम यांनी आयुष्याची अखेर केली. रेल्वेखाली उडी घेत वैभव कदमांनी मृत्यूला कवटाळलं. करमुसे प्रकरणात चौकशीसाठी वारंवार बोलावून मानसिक त्रास दिला जात असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. ‘पोलीस आणि मीडियाला एकच विनंती आहे, मी आरोपी नाही’ असे व्हॉट्सअप स्टेटस ठेवत कदम यांनी जीवनयात्रा संपवली. जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील आक्षेपार्ह पोस्ट अनंत करमुसे यांनी व्हायरल केल्याचा आरोप होता. या प्रकरणामुळे काही पोलीस अंगरक्षकांसह खासगी कार्यकर्त्यांनी करमुसे यांना आव्हाड यांच्या ‘नाद’ बंगल्यावर आणल्याचा दावा केला जात होता. तिथे जितेंद्र आव्हाड यांच्यासमोरच फायबरच्या काठीसह लोखंडी रॉडने जबर मारहाण केली गेली असल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. ५ एप्रिल २०२० रोजी रात्री ११.५० ते ६ एप्रिल सकाळी ६.२२ वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडल्या दावा होता. या प्रकरणी ६ एप्रिल रोजी करमुसे यांच्या तक्रारीनंतर वर्तकनगर पेालीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर यामध्ये मुंबई सुरक्षा दलातील हवालदार वैभव कदम, सुरेश जनाठे तसेच ठाणे मुख्यालयातील पोलीस शिपाई सागर मोरे हे तीन पोलीस कर्मचारी तसेच अभिजित पवार, समीर पवार, हेमंत वाणी, सूरज यादव, ज्ञानोबा वाघमारे, दिलीप यादव या खासगी कार्यकर्त्यांसह १२ जणांना अटक झाली होती. यापैकी मुंबई सुरक्षा दलातील हवालदार वैभव कदम यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.

वैभव कदम हे तळोजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याचे समोर येत आहे. करमुसे प्रकरणात चौकशीसाठी वारंवार बोलावून मानसिक त्रास दिला जात असल्यामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

गर्लफ्रेण्ड आणि दोन मित्रांसह ओयो रुम बूक, आधी केक कापला मग तिथेच जीवन संपवलं
वैभव कदम गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणावाखाली असल्याचे बोलले जाते. त्यांची मानसिक स्थिती कशी होती हे त्यांनी ठेवलेल्या फेसबुक आणि व्हॉट्सअप स्टेटसवरुन समोर आलंय. त्यांनी ठेवलेल्या शेवटच्या स्टेटसमध्ये त्यांनी लिहिलंय की ‘पोलीस आणि मीडियाला माझी एकच विनंती आहे मी आरोपी नाही आहे’ त्यामुळे प्रचंड तणावाखाली त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा सुरू आहे.

बेस्टवरच्या जाहिराती काढा नाहीतर मराठी माणूस १२ तासात बेस्ट फोडणार : जितेंद्र आव्हाड

दरम्यान, ठाण्यातील शासकीय रुग्णालय येथील शवगृहाजवळ राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड दाखल झाले आहेत. तात्काळ बॉडी नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची मागणी आव्हाडांनी केली आहे.

चिंगीला टेडीसारखी आंघोळ घालूया, दोन चिमुकल्या बहिणींचा अट्टाहास, पाण्यात बुडून बाळाचा अंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here