छतरपूर: मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यात एका वृद्ध पुजाऱ्यानं मंदिर परिसरात जिवंत समाधी घेतल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. गौरैया गावात ही घटना घडली. गावातील सिद्ध बाबा मंदिराचे ६० वर्षीय पुजारी नारायण दास यांनी जमिनीत ६ फूट खड्डा खणला. यानंतर दास खड्ड्यात जाऊन बसले. ४८ तासांची समाधी घेण्याचा त्यांचा मानस होता. दास आत गेल्यावर भक्तांनी खड्डा वरून बंद केला. दास जिवंत समाधी घेण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यानंतर एकच हलकल्लोळ माजला. प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी मंदिर परिसरात धाव घेत माती बाजूला सारली आणि दास यांना खड्ड्यातून बाहेर काढलं. नारायण दास यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आलेली आहे. त्यांची प्रकृती ठीक असल्याचं तहसीलदार संध्या अग्रवाल यांनी सांगितलं. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दास यांनी काही दिवसांपूर्वीच समाधी घेण्याची घोषणा केली होती. मंगळवारी दास यांनी मंदिर परिसरात ६ फूट खोल खड्डा खणला. २९ मार्चला दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी मी खड्ड्यातून आवाज देईन, असं त्यांनी भक्तांना सांगितलं होतं. दास खड्ड्याच्या आत शिरल्यानंतर भक्तांनी खड्डा बुजवला. तितक्याच याची माहिती कोणीतरी पोलिसांना दिली.
७ रुम, १२ बेड्स, १६ बाटल्या, ‘ती’ पाकिटं; प्रसिद्ध शाळेवर अचानक धाड; आत नेमकं काय चालायचं?
थोड्याच वेळात पोलीस आणि तहसीलदार संध्या अग्रवाल यांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी माती बाजूला काढून पुजाऱ्याला बाहेर काढलं. खड्ड्यात पुजारी झोपलेला होता आणि त्यांच्या शेजारी एक दिवा तेवत होता, अशी माहिती तहसीलदारांनी दिली. पुजारी आत जाण्यापूर्वी त्यांच्या भक्तांनी त्यांची विधिवत पूजा केली. त्यानंतर खड्ड्यावर लोखंडी पत्रा टाकून त्यावर मातीचा २ फुटांचा थर चढवला. यानंतर त्यावर मातीची ५ मडकी ठेवली.

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

गावात या घडामोडी सुरू असताना उपस्थितांपैकी एकानं पोलिसांना माहिती दिली. पोलीस आणि प्रशासनानं तातडीनं हालचाली सुरू केल्या. त्यांनी घटनास्थळ गाठून दास यांना सुरक्षित बाहेर काढलं. गोरैया गावाबाहेर सिद्ध बाबा मंदिर आहे. तिथे ६० वर्षांचे नारायण दास कुशवाह पूजा अर्चना करतात. त्यांनी मंगळवारी दुपारी समाधी घेण्याचा प्रयत्न केला. आन्ही वेळीच जाऊन त्यांना सुखरुप बाहेर काढलं. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांची प्रकृती ठीक आहे, असं तहसीलदारांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here