मुंबई: विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने ४० वर्षीय इंजिनीअर पतीला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुंबईतील मुलुंडमध्ये २०१७ साली हे हत्याकांड घडलं होतं.

२०१७ साली मुलुंड येथील घरात ३३ वर्षीय श्रेया हिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. तिच्या रक्ताचे डाग पती जयेश म्हादळेकर याच्या कपड्यांवर लागले होते. मात्र, माझा या हत्येशी काहीही संबंध नाही. हत्या झाली त्या दिवशी हैदराबादला होतो, असा बचाव त्याने केला होता. मात्र, कपड्यांवर रक्ताचे डाग पडले कसे, याबाबत तो समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकला नाही. हत्येच्या घटनेनंतर तो फरार झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी तो पुन्हा घरी परतला होता. मात्र, आपण पत्नीची हत्या केली नाही असे त्याने कोर्टात सांगितलं होतं. हत्येची दिवशी हैदराबादला असल्याचे त्याने कोर्टात सांगितले होते. मात्र, तो रेल्वे तिकीटही सादर करू शकला नाही.

श्रेया ही एका खासगी रुग्णालयात नोकरी करत होती. तिचा मानसिक छळ होत होता. तिच्यासोबत वाद झाला असता, जयेशनं तिच्या डोक्यात प्रेशर कुकरने प्रहार केला आणि तिची हत्या केली होती. कोर्टात जयेशनेच पत्नीची हत्या केल्याचे सिद्ध झाले होते. या प्रकरणी जयेशला कोर्टाने दोषी ठरवले होते. २००३ साली दोघांचे लग्न झाले होते. दोन वर्षांनी त्यांना मुलगा झाला. श्रेयाच्या आईने कोर्टात साक्ष देताना सांगितले की, जयेश श्रेयाच्या चारित्र्यावर संशय घेत असे. दारू पिऊन तो तिला त्रास देत होता. तिला मारहाण करत होता. त्यामुळे ती मुलाला घेऊन माहेरीही आली होती. त्यानंतर जयेश तिला घरी घेऊन जाण्यासाठी आला होता. मात्र, तिनं परत जाण्यास नकार दिला होता. जयेशने घर सोडल्यानंतर काही वेळातच श्रेयासुद्धा घराबाहेर पडली होती. घराबाहेर जयेश तिची वाट बघत बसला होता. त्यानंतर दोघेही सोबतच निघून गेले होते.

श्रेया घरी परतली नाही. ती कामावर निघून गेली असावी, असा तिच्या आईचा समज झाला. पण काही वेळाने कुटुंबीयांनी कामाच्या ठिकाणी फोन करून विचारलं असता, ती आज कामावर आलीच नाही असं सांगण्यात आलं. बराच वेळ तिचा शोध घेतल्यानंतर श्रेयाची बहीण आणि आई तिच्या सासरी गेली. त्यावेळी श्रेया निपचित पडली होती. तिच्या डोक्यावर जखमा झाल्या होत्या. साक्ष आणि पुराव्यांनुसार जयेशनेच तिची हत्या केल्याचं सिद्ध झालं होतं. कोर्टाने या प्रकरणी त्याला दोषी ठरवलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here