नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीचा प्रयोग २०१९ मध्ये सुरु झाला. महाविकास आघाडीच्या स्थापनेत खासदार संजय राऊत यांची भूमिका निर्णायक होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारनं अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात सेनेचे आमदार आणि भाजपनं सत्ता स्थापन केली. त्यानंतर महाविकास आघाडीत फूट पडेल असा अंदाज अनेक राजकीय विश्लेषकांचा होता. सत्तेत नसताना देखील महाविकास आघाडीनं एकजूट कायम ठेवली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या एका वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत सावरकर हे सेनेचं दैवत असल्याचं म्हटलं. त्यानंतर महाविकास आघाडीसंदर्भात उलट सुलट चर्चा झाल्या होत्या.
काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सहभागी झाला नव्हता. त्यामुळं महाविकास आघाडी सुरु राहील की नाही याबाबत चर्चा सुरु झाल्या होत्या. भाजपकडून उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासंदर्भात आव्हान देण्यात येत होतं.मविआची एकत्रित ताकद २ एप्रिलच्या सभेत दिसणार?
काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सहभागी झाला नव्हता. त्यामुळं महाविकास आघाडी सुरु राहील की नाही याबाबत चर्चा सुरु झाल्या होत्या. भाजपकडून उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासंदर्भात आव्हान देण्यात येत होतं.
संजय राऊत यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेतली होती. आज संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी याची भेट घेतली.
संजय राऊत यांचं ट्विट
खासदार संजय राऊत यांनी आजच्या भेटीसंदर्भात माहिती दिली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली असून महत्त्वाच्या मुद्यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती राऊत यांनी दिली. अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. सर्व काही आलबेल आहे. चिंता नसावी, असं संजय राऊत म्हणाले.
मविआची एकत्रित ताकद २ एप्रिलच्या सभेत दिसणार?
महाविकास आघाडीनं राज्यभरात सभांचं आयोजन केलं आहे. मविआची पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या निमित्तानं शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.