भोपाळ: मध्य प्रदेशच्या वनरक्षक भरतीच्या शारीरिक चाचणीत एक अजब घटना घडली. चालण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेला उमेदवार आघाडीवर असलेला उमेदवार अनुत्तीर्ण ठरला. तो रस्त्यात आराम करण्यासाठी थांबला. त्याला गाढ झोप लागली. या दरम्यान इतर उमेदवार त्याच्या पुढे निघून गेले. ते उत्तीर्ण झाले. तरुण झोपेतून उठला, त्यावेळी त्याला आपण अनुत्तीर्ण झाल्याचं समजलं. त्याला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला. हा प्रकार पाहून अनेकांना पंचतंत्रातील ससा-कासवाची गोष्ट आठवली.ग्वाल्हेरच्या डबरा शहरात राहणारा २१ वर्षांचा पहाड सिंह वनरक्षक भरती परिक्षेसाठी २८ मार्चला खंडव्याला गेला होता. स्पर्धेत एकूण ६१ जण सहभागी झाले. त्यात ९ तरुणी आणि ५२ तरुणांचा सहभाग होता. २४ किमीचं अंतर सगळ्यांना चालत ४ तासांत पार करायचं होतं. सकाळी ६ वाजता खंडवाच्या हरसूद नाक्यावरून सुरू झालेली शर्यत सकाळी १० वाजता तिथेच संपणार होती. उमेदवारांना चार चेक पॉईंटमधून जायचं होतं.
शर्यत सुरू होताच पहाड सिंह सुसाट सुटला. चारही चेक पॉईंट त्यानं पार केले. पहाड सिंहनं सगळ्यांनाच मागे टाकलं. मात्र तो शेवटच्या चेक पॉईंटपर्यंत पोहोचलाच नाही. सकाळी १० वाजता शेवटच्या टप्प्याच्या ठिकाणी पोहोचलेल्या उमेदवारांची गणना करण्यात आली. तिथे ६० उमेदवार उपस्थित होते. एक उमेदवार कमी असल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. पहाड सिंह अद्याप शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला नसल्याचं अधिकाऱ्यांना समजलं. यानंतर वनाधिकाऱ्यांची वाहनं पहाड सिंहला शोधण्यास निघाली.

सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्सटॉर्शनला बळी पडला असाल तर काय कराल?
शेवटच्या टप्प्यापासून काही अंतरावर एका झाडाच्या सावलीत पहाड सिंह झोपलेला होता. अधिकाऱ्यांनी त्याला उठवलं. तो दचकून उठला. झोपलास का, अशी विचारणा अधिकाऱ्यांनी केली. त्यावर पायाला फोड आल्यानं थोडा वेळ आराम करण्यासाठी थांबलो होतो. तितक्यात गाढ झोप कधी लागली ते कळलंच नाही, असं उत्तर पहाड सिंहनं दिलं. ‘एक उमेदवार आराम करण्यासाठी थांबला होता. त्या दरम्यान तो झोपला. त्याला अपात्र ठरवण्यात आलं आहे,’ अशी माहिती खंडवा वनाधिकारी जे. पी. मिश्रा यांनी दिली. पहाड सिंहनं त्याच्याकडून झालेल्या चुकीबद्दल पश्चाताप व्यक्त केला. मी अनेक वर्षांपासून परीक्षेची तयार करत होतो. एका चुकीमुळे माझ्या हातून सरकारी नोकरी गेली, अशी खंत पहाडनं बोलून दाखवली.