दोन दिवसात कापसाच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ
गेल्या काही दिवसात कापसाच्या दरात सुधारणा होऊन वाढ होत असताना सोमवारी कापसाच्या दरात घसरण झाल्याचं चित्र होतं. परंतु, मंगळवारी कापसाच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाली. अकोला जिल्ह्यातल्या अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी ७ हजार ७०० पासून ८ हजार ३२५ रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलप्रमाणे कापसाला भाव मिळाला होता. आज पुन्हा बुधवारी कापसाच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कापसाचे भाव ७ हजार ८०० पासून ८ हजार ४२५ रूपये इतका प्रतिक्विंटल प्रमाणे गेले. आज १ हजार ४५० एवढा क्विंटल कापूस खरेदी झाला आहे. उद्या ३० मार्च म्हणजेच गुरुवारी श्रीराम नवमी निमित्त अकोटचा बाजार बंद राहणार असून ३१ मार्च रोजी व्यापाऱ्यांनी दिलेल्या अर्जानुसार आर्थिक वर्ष अखेर असल्याने बाजार बंद राहील. याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असं आवाहन अकोट बाजार समितीने केलं आहे.तुरीचे दर १७० रुपयांनी घटले
अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी तुरीला ५ हजार ५०० पासून ८ हजार ८०० रूपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला होता, दरम्यान गेल्या दोन दिवसात तुरीची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने मंगळवारी तुरीच्या दरात १६५ रूपयांनी वाढ झाली. त्यामुळे तुरीचा भाव ७ हजार ७०० पासून ते ८ हजार ९६५ रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे गेला होता. परंतु आज बुधवारी तुरीच्या दरात १७० रुपयांनी घसरण झाल्याचे दिसून आलं. म्हणजेच आजचा तुरीचा भाव प्रतिक्विंटल मागे ७ हजार पासून ८ हजार ८ हजार ७९५ रूपयांपर्यत मिळाला. दरम्यान बाजारात १ हजार १४५ क्विंटल इतकी तुरीची खरेदी झाली आहे.
अकोटच्या बाजारात तुरीच्या दारात १३५ रुपयांनी वाढ
अकोटच्या कृषी बाजारात काल तुरीला ७ हजार ८०० ते ८ हजार ७३० प्रतिक्विंटप्रमाणे भाव मिळाला होता. परंतु कालच्या तुलनेत आज तुरीच्या दरात अकोटच्या बाजारात १३५ रुपयांनी वाढ झाली असून इथे आज तुरीच्या आवक कमी होती. ८०० एवढी क्विंटल तूर खरेदी झाली आहे. दरम्यान आज तुरीला ८ हजार ११० पासून ८ हजार ८६५ रूपयांपर्यत तुरीला भाव मिळाला आहे. अकोल्यात असलेल्या तुरीच्या दराच्या तुलनेत अकोटच्या बाजारात तुरीला ७० रुपयांनी जादा भाव आहे.
हरभऱ्याच्या दरात अकोल्यात १०० रुपयांनी घसरण; तर अकोटात ५५ रुपयांनी वाढ
अकोल्यात हरभऱ्याच्या दरात काल १४० रुपयांनी वाढ झाली होती, त्यामुळ हरभऱ्याचे भाव ४ हजार ते ५ हजार १४० रूपयांपर्यत प्रतिक्विंटलवर पोहोचले होते. या दिवशी ४ हजार ११४ क्विंटल इतकी हरभऱ्याची आवक झाली होती. परंतु आज हरभऱ्याच्या दरात शंभर रुपयांनी घसरण झाली झाल्याने दर ४ हजार २०० पासून ५ हजार ४० रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे आले आहेत. तसेच पांढऱ्या हरभऱ्याला ५ हजार ६५५ रूपयांपर्यंत प्रतिक्विंटल भाव होता. तर अकोटच्या बाजारात कालच्या तुलनेत आज हरभऱ्याच्या दरात ५५ रुपयांनी वाढ झाली असून ४ हजार ४०५ पासून ५ हजार १४५ प्रतिक्विंटरप्रमाणे हरभऱ्याला भाव मिळाला आहे.