लखनऊ: उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये चोरट्यांनी पुन्हा एकदा दागिन्यांच्या दुकानाला लक्ष्य केलं आहे. चोरट्यांनी १० फूट लांब भुयार खणून सराफा दुकानात चोरी केली. १५ लाखांचे दागिने घऊन त्यांना पळ काढला. विशेष म्हणजे चोरट्यांनी दुकान मालकासाठी एक चिठ्ठी लिहिली. त्यात त्यांनी दुकानातील एका गोष्टीचं विशेष कौतुक केलं. मेरठमधील अंबिका ज्वेलर्सवर चोरट्यांनी डल्ला मारला. नौचंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंबिका ज्वेलर्स येतं. गढ रोड परिसरात असलेल्या ज्वेलर्समध्ये चोरटे भुयार खणून घुसले. त्यांनी दुकानातील १५ लाखांचे दागिने घेऊन पोबारा केला. चोरट्यांनी मालकासाठी एक चिठ्ठी मागे ठेवली. ‘सॉरी भाई! आमचा नाईलाज होता. चोरी केल्याबद्दल माफ करा. पण तुमची फरशी खूपच मजबूत आहे,’ असं चोरट्यांनी चिठ्ठीत नमूद केलं आहे.
आशिष कुठेय? आई-वडील जीव तोडून धावले; लिफ्टच्या आत डोकावून पाहिले; लेकराचे पाय लटकत होते
अंबिका ज्वेलर्सचे मालक पीयूष गर्ग चोरीची माहिती मिळताच दुकान उघडण्यासाठी पोहोचले. दुकानात डल्ला मारणारे चोरटे नाल्यातून भुयार खणून फरशी फोडून आत घुसले होते, हे गर्ग यांच्या लक्षात आलं. चोरट्यांनी दुकानातील सोन्याचांदीचे दागिने लंपास केले. चोरट्यांनी तिजोरी फोडण्याचादेखील प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी सोबत गॅस कटर आणला होता.
वनरक्षक पदाची भरती, तरुण सुसाट; पण एक चूक नडली अन् पंचतंत्राची स्टोरी रिपीट, सगळेच चकित
दुकानात चोरी झाल्याची माहिती पीयूष गर्ग यांनी अन्य व्यापाऱ्यांना आणि सराफा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिली. यानंतर सराफा व्यावसायिक दुकानाबाहेर जमले. त्यांनी पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. थोड्याच वेळात पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दुकानदार त्यांना आत जाऊ देत नव्हते. पोलीस गो बॅक अशा घोषणा त्यांनी दिल्या.

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

चोरटे सराफा व्यापाऱ्यांना सातत्यानं लक्ष्य करत आहेत. मात्र पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही, अशा शब्दांत व्यावसायिकांनी संताप व्यक्त केला. भुयार खणून दागिन्यांच्या दुकानात चोरी झाल्याची ही मेरठमधील चौथी घटना आहे. अशा प्रकारच्या चोऱ्या सातत्यानं होत असल्यानं सराफा व्यावसायिक धास्तावले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here