छत्रपती संभाजीनगर : लग्न लावून दिलेल्या मुलीने प्रेमासाठी पतीचे घर सोडले. समाजात बदनामीच्या उद्देशाने कुटुंबीयांनी दोघांना विरोध केला. प्रेमी युगुलाने धावत्या रेल्वेसमोर उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत प्रियकराचा मृत्यू झाला असून प्रेयसी गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास एकनाथनगर रेल्वेफाटकाजवळ घडली. उमेश मोहन तारू (वय २३, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर जि. जळगाव) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर प्रेयसी जखमी झाली. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश तारू आणि प्रेयसी (वय १९) हे दोघे नातेवाईक आहेत. उमेश हा मुक्ताईनगरमध्ये बीएससीचे शिक्षण घेत होता. त्याचवेळी दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते. २८ फेब्रुवारीला संबंधित मुलीचा विवाह मध्यप्रदेशातील नातेवाईकाशी घरच्यांनी लावून दिला होता . ते सध्या ठाण्यात वास्तव्यास होते. लग्नानंतरही उमेश आणि प्रेयसी हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. दरम्यान, मुलीने घरी उमेशसोबतच्या प्रेमसंबधांची तसेच लग्न करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. कुटूंबीयांनी नकार दिल्याने दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. शहरात येऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. ही दुर्घटना पाहिल्यानंतर स्थानिकांनी डायल ११२ वर दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

बॉडीगार्डची आत्महत्या की हत्या याचा तपास पोलीस करतील, त्यात राजकारण नको, रोहित पवारांनी मोहित कंबोजना सुनावलं

पोलिसांनी दोन्ही जखमींना घाटी रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान उमेशचा मृत्यू झाला. प्रेयसी गंभीर जखमी आहे. या घटनेची नोंद उस्मानपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार ए. वाय. फिरंगे करत आहेत

धंगेकर भेटायला गेले तर बापट म्हणाले, रवी काही अडचण आली तर सांग, मी बघतो…

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्योती नगर भागात राहणाऱ्या आरती हेमंत शर्मा (वय ४५) या महिलेने घरात गळफास घेतल्याचा प्रकार बुधवारी (२९ मार्च) सकाळी उघडकीस आला.

पाकिस्तानपुढे अखेर BCCI नमली? वनडे विश्वचषकासाठी एक पाऊल मागे, पाहा नेमकं काय घडलं..

घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here