चीनची विवो हि कंपनी आता बीसीसीआयला धक्का द्यायला सज्ज झाली आहे. त्यामुळे आता आयपीएलपुढील समस्या वाढली असल्याचे म्हटले जात आहे.

काही दिवसांपासून बीसीसीआयने चीनच्या कंपनीचे प्रायोजकत्व आयपीएलसाठी घेऊ नये, असे म्हटले जात होते. पण बीसीसीआयने मात्र ते ऐकले नाही. पण आता गेल्या दोन दिवसांपासून जर चीनच्या कंपनीचे प्रायोजकत्व आयपीएलला मिळणार असेल, तर ही स्पर्धा रद्द करावी, असे म्हटले जात होते. याबाबत भारताच्या केंद्रीय मंत्र्यांनाही पत्र पाठवण्यात आले होते. पण बीसीसीआयने प्रायोजकत्व रद्द करण्यापूर्वीच चीनची कंपनी त्यांना धक्का द्यायला सज्ज झालेली पाहायला मिळत आहे

गेल्या ४८ तासांमध्ये चीनच्या विवो कंपनीबरोबर आयपीएललाही ट्रोल केले गेले. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही गोष्ट कोणत्याही ब्रँडसाठी चांगली नाही. त्यामुळे आता विवो या कंपनीने आयपीएलबरोबरचा करार रद्द करण्याचे ठरवले असल्याचे दिसत आहे. जर विवोने आता लगेच जर आपला करार रद्द केला तर बीसीसीआयचे प्रचंड नुकसान होऊ शकते, असे म्हटले जात आहे.

बीसीसीआय युएईमध्ये आयपीएलचे आयोजन करणार आहे. आयपीएलला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. पण आयपीएलसाठी बीसीसीआयने मुख्य प्रायोजन म्हणून चीनच्या विवो या कंपनीला कायम ठेवले आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये तणावाचे संबंध असताना बीसीसीआय विवोचे प्रायोजकत्व कसे घेऊ शकते, हा प्रश्न यापूर्वीही उठला होता. आता भारतातील काही महत्वाच्या व्यक्तींनी आयपीएल रद्द करण्याची मागणी केली आहे.

यंदाची आयपीएल रद्द करण्यात यावी, अशी मागणी भारतातील व्यापारी संघटनेने केली आहे. यावेळी या संघटनेने भारताचे गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी आयपीएल रद्द करण्याची मागणी केली आहे.

या पत्रामध्ये संघटनेने लिहिले आहे की, ” बीसीसीआय आयपीएल युएईमध्ये खेळवत आहे. पण या आयपीएलचे मुख्य प्रायोजकत्व हे चीनच्या विवो कंपनीकडे आहे. भारत आणि चीन यांच्या बॉर्डरवर नेमकी काय परिस्थिती आहे, हे सर्वांनाच परिचित आहे. त्यामुळे जर आयपीएलमध्ये चीनच्या कंपनीचे प्रायोजकत्व असेल तर भारतीयांच्या भावना नक्कीच दुखावल्या जातील. त्यामुळे याबाबत केंद्र सरकारने योग्य तो निर्णय लवकर घ्यावा. कारण आपले पंतप्रधान एकिकडे आत्मनिर्भर होण्यावर भर देत आहेत, त्याचवेळी चीनच्या कंपनीचे प्रायोजकत्व बीसीसीआयने आयपीएलसाठी घेणे कितपत योग्य आहे.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here