नांदेड : घरात मुलीच्या लग्नाची लगबग सुरू होती. कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र काही क्षणातच त्यांच्या या आनंदावर विरजण पडलं. लेकीच्या लग्नापूर्वीच पित्याचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात मंगळवारी रात्री हा हृदय पिळवून टाकणारा प्रसंग घडला. वाघजी सखाराम लिंगायत ( वय ४५ वर्षे ) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वाघजी लिंगायत हे अर्धापूर तालुक्यात सालगडी म्हणून काम करायचे. आपल्या कुटुंबियांच्या सोबत शेतीचे काम देखील करायचे.

मंगळवारी रात्री वाघजी लिंगायत हे किराणा सामान खरेदी करण्यासाठी सायकल वर जात होते. रात्री 8 वाजताच्या सुमारास शहरातील कृषी कार्यालयासमोर पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने वाघजी यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलीस आणि अर्धापूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मयताचे पार्थिव शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

मयत वाघजी यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. त्यातील नेहा या मुलीचा एप्रिल महिण्यात विवाह ठरला होता. लग्नाला काही दिवस शिल्लक असल्याने कुटुंबियांची लग्नाची लगबग देखील सुरु होती. मात्र लेकीच्या लग्नापूर्वीच वधू पित्याचे अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणी अर्धापूर पोलिसांनी ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अशी वेळ कुठल्याही माऊलीवर नको; बाईकवरच तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू, आईच्या कुशीत अंग टाकलं

जड वाहनाच्या प्रवेश बंदीचा फज्जा

अर्धापूर शहरात वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात जड वाहनास प्रवेश बंदी आहे. परंतु बंदी असताना देखील दररोज जड वाहनांची वाहतूक सुरु आहे. पोलिसांकडून देखील जड वाहनांवर कुठलीच कारवाई केली जात नसल्याचा आरोप होत आहे. जड वाहनांच्या वाहतुकीचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास देखील सहन करावा लागत आहे.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रीकरणावेळी दरीत कोसळलेल्या युवकाचा मृत्यू

गुत्तेदारांचा हलगर्जीपणा

अर्धापूर शहरात रस्त्याचे काम सुरू आहे. गुत्तेदाराकडून वाटेल तिथे खोदकाम करण्यात आल्याने वाहतुकीवर याचा परिणाम होत असल्याचा दावा केला जात आहे. रस्त्यावरील धुळीमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
एकच विनंती आहे, मी आरोपी नाही… जितेंद्र आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाने आयुष्य संपवलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here