पुणेः अभ्यासाचा आणि परीक्षेचा बोजा विद्यार्थ्यांना झेपला नाही तर, नैराश्यात कोणत्याही थरला जाऊन टोकाचे पाऊल उचलायला विद्यार्थी तयार असतात. पुण्यातल्या बी.जे मेडिकल कॉलेजमध्ये अशीच एक घटना घडली आहे. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे मुलीचे वडील मुलीला कॉलेजमध्ये सोडवायला आले होते. पण वडिलांना काय माहिती होतं की आपल्या मुलीचा आजचा शेवटचा दिवस होता. बी.जे मेडिकल कॉलेजमध्ये प्रथम वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा परीक्षेचा अभ्यास पूर्ण न झाल्याने त्याच्या नैराश्यातून तरुणीने ससून रुग्णालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला तत्काळ उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

महामार्गावर रस्ता ओलांडताना तोल गेला, त्याचवेळी कंटेनरची धडक, मद्यधुंद तरुणाचा जागीच जीव गेला
अदिती दलभंजन (२०, रा. सिंहगड रोड) असे आत्महत्या करण्यात आलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. याबाबत बंडगार्डन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

नेरुळ सावजीभाई हत्याकांड; एकाने रेकी केली, दुसऱ्याने गोळ्या झाडल्या; मुख्य आरोपी ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार, अदिती ही आपल्या आई-वडिलांबरोबर आनंदनगर येथे राहण्यास असून, ती अभ्यासात अतिशय हुशार होती. तिने चांगल्या पध्दतीने अभ्यास करून व चांगले गुण संपादन करून बी.जे. मेडिकलला प्रथम वर्षाला प्रवेश घेतला होता. परंतु, तिच्या कॉलेजच्या परीक्षेचा अभ्यास न झाल्याने तिला काही प्रमाणात नैराश्य आले होते. तिने वडिलांना याची कल्पनादेखील दिली होती. बुधवारी सकाळी तिचे वडील तिला नेहमीप्रमाणे तिच्या कॉलेजमध्ये सोडून गेले. परंतु, अभ्यास न झाल्याने तिने ससून रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तिने आत्महत्या करताना तिचा मोबाईल टेरेसवरच ठेवला होता. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहे.

घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स अपडेट; परिवहन विभागाच्या ‘या’ ७ सेवा ‘फेसलेस’, असा करा अर्ज…

मी डेअरिंग केली आणि नाचलो; मोलमजुरी करणाऱ्या आई-बापाच्या लेकानं लावणीमध्ये गौतमीलाही मागे टाकलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here