मुंबईः गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या लाखो चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. ई-पास, १४ दिवसांचा क्वारंटाइन, करोना चाचणीच्या कचाट्यात सापडलेल्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोकणात जाण्यासाठी राज्य सरकारकडून एसटी बसेसची व्यवस्था करण्यात येणार असून उद्यापासून आरक्षण सुरू होणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री यांनी ही माहिती दिली आहे.

यंदा गणेशोत्सवावर करोनाचे सावट आहे. त्यामुळं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मार्गात अनेक विघ्न समोर येत आहेत. ई- पास आणि क्वारंटाइनचा कालावधी यामध्ये अडकलेल्या चाकरमान्यांना या निर्णयामुळं काही अंशी दिलासा दिलासा मिळाला आहे. एसटी प्रशासनानं ३ हजार बसेची व्यवस्था चाकरमान्यांसाठी केली आहे. तसंच, एसटीने जाणाऱ्या प्रवाश्यांना कोणत्याही प्रकारच्या इ-पासची आवश्यकता भासणार नाही. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी ग्रुप बुकिंग केल्यास गावापर्यंत एसटी सोडण्याची सोयही प्रशासनानं केली आहे. यंदा मात्र, प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के एसटी चालवण्यात येणार आहेत. तसंच, कोणतेही अतिरिक्त भाडेही अकारण्यात येणार नसल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

तसंच, गावाला गेल्यावर १४ दिवसांचा क्वारंटाइनचा कालावधी १० दिवसांवर केला आहे. चाकरमान्यांसाठी आयसीएमआरच्या निकषांप्रमाणे क्वारंटाईनचा कालावधी १० दिवसांवर करण्यात आला असून १२ ऑगस्टनंतर कोकणात जाणाऱ्यांची स्वॅब टेस्ट करण्यात येईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

एसटीमध्ये २२ लोकांना प्रवास करता येणा असून बस सुटल्यानंतर थेट गावातच बस थांबणार मध्ये कुठेही थांबा घेणार नाही. प्रवाश्यांना त्यांच्या जेवणाची सोय स्वतःच करावी लागणार आहे. जेवणासाठी एसटी कुठेही थांबणार नाही. तसंच, खासगी बस सेवेनंही एसटी भाड्यापेक्षा दीडपट भाडे घ्यावे, जर याबाबतच्या तक्रारी आल्यास कारवाई करण्याचा इशारा, अनिल परब यांनी दिली आहे.

बुकिंग करता येणार

उद्यापासून एसटीचे ऑनलाइन आरक्षण सुरू होणार असून १० ऑगस्टपर्यंत गाड्या कोकणात रवाना होणार असल्याची माहिती, महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here