चौकशीदरम्यान ताब्यात घेतलेला आरोपी रोहित मेहता याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणातील आणखी एक आरोपी दीपक साओ यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली. तेव्हा या संशयित आरोपींनी पोलिसांना सांगितले की, बेपत्ता सोनी कुमारीची हत्या केल्यानंतर मृतदेह लपवण्याच्या उद्देशाने त्यांनी मृतदेहाला दगड बांधून डोमचांच पोलीस स्टेशन हद्दीतील पाण्यात टाकला.
सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार
२६ आणि २७ मार्च रोजी पोलिसांनी खाणीतील पाण्यात पोत्यात असलेला मृतदेह बाहेर काढला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणामागील मुख्य कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली. कोडरमा एसडीपीओ प्रवीण पुष्कर यांनी यांगितलं की, ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींपैकी एक संपूर्ण प्रकरणातील मुख्य आरोपी आहे, ज्याचे नाव दीपक साव आहे.
तो पूर्वी सोनी कुमारी उर्फ सोनाली कुमारीला ट्युशन शिकवायचा आणि ट्युशन शिकवत असताना तो सोनी कुमारीवर एकतर्फी प्रेम करु लागला. दीपकने सोनीकडे अनेकवेळा आपले प्रेम व्यक्त केले. मात्र, सोनीने प्रत्येक वेळी ते नाकारले. त्यानंतर या शिक्षकाने सोनी कुमारीला धडा शिकवण्याचा निर्धार केला आणि हा कट रचला.