मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला लागूनच असलेला हिमालय पूलाच्या पुनर्बांधणीचे काम अखेर पूर्ण झाले असून आजपासून हा पुल रहदारीसाठी खुला करण्यात आला आहे. पुलाची तपासणी आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३० मार्चपासून हिमालय पूल प्रवाशांसाठी व नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. १४ मार्च २०१९मध्ये हिमालय पूल कोसळला होता. या दुर्घटनेत सात जणांनी आपला जीव गमावला होता. त्यानंतर तो पूल पाडून नवीन बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. मार्च २०२०मध्ये करोनाचा संसर्ग आणि अन्य काही तांत्रिक कारणांमुळे पुलाचे काम रखडले होते. मात्र, आता पालिकेने कामाला गती देऊन मार्चअखेर पूल सुरू केला आहे. नवीन आराखड्यानुसार स्टेनलेस स्टीलचा वापर पुलासाठी करण्यात आला आहे.

पुणेः बाबांनी कॉलेजबाहेर सोडले पण ते शेवटचेच, ससूनच्या इमारतीवरून उडी घेत तरुणीने संपवले जीवन
मुंबईत पोलादापासून तयार करण्यात येणारा हा पहिलाच पूल ठरणार आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर दररोज सुमारे ५० हजार पादचाऱ्यांना लाभ होणार आहे. पुलाच्या बांधकामासाठी सात कोटी रुपये खर्च आला असून पुलाची लांबी ३३ मीटर आणि रुंदी ४.४ मीटर आहे. पुलाकडे सरकता जिनाही बसविला जाणार आहे. मात्र, तूर्तास नागरिकांना पुलांसाठी साध्या जिन्याचा मार्ग वापरता येणार आहे. येत्या सहा महिन्यात सरकते जिने नागरिकांसाठी खुले करण्यात येतील.

देवदूत असे दिसतात! रुग्णाला वाचवायला जीवाची बाजी, गरोदर डॉक्टरने स्वतः रुग्णवाहिका चालवली
हिमालय पुलाची वैशिष्ट्ये

हा पूल सुरू झाल्यास प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील गर्दी विभागण्यासही मदत होणार आहे.

-जुना पूल लोखंडापासून तयार करण्यात आला होता.

-नवीन पूल पोलादापासून तयार करण्यात आला आहे.

-या पुलासाठी सात कोटी रुपयांहून अधिक खर्च आला आहे.

महामार्गावर रस्ता ओलांडताना तोल गेला, त्याचवेळी कंटेनरची धडक, मद्यधुंद तरुणाचा जागीच जीव गेला

उदे गं अंबे उदे! ऑस्ट्रेलियातील देवीभक्त अमरावतीत; मराठीतून गाणं गात अंबाबाईचा जोगवा मागितला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here