वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील आरे पुलाखालून जेसन कोएल्हो याला मंगळवारी एका ट्रॅफिक पोलिसांने चुकीच्या दिशेने गाडी चालवत असल्याच्या कारणावरुन अडवले. कोएल्हो म्हणाले की त्यांनी पोलिसाला चालान जारी करण्यास सांगितले, जे तो नंतर भरेल. “मी मुंबई वाहतूक पोलिसांचे अॅप तपासत होतो, पण हवालदाराने कोणतेही चलन जारी केलेले नव्हते. त्याने मला माझी दोन प्रलंबित चालान मिटवण्यास सांगितलं. सर्व चालानाची थकबाकी १५०० रुपये होती, परंतु तो मला दंड म्हणून २ हजार रुपये मागत होता. जोपर्यंत मी लाच दिली नाही, तोपर्यंत तो मला धमकी देत राहिला”, असे कोएल्होने टाइम्सला सांगितले. तो म्हणाला की गुगलपे द्वारे ५०० रुपयांची लाच देण्यासाठी पोलिसाने त्याला क्यू आर कोड दाखवला.
२०२० साली सेवानिवृत्त, तरी नागरिकांसाठी नांदेडच्या वाहतूक पोलिसाची दररोज विनाशुल्क सेवा
कोएल्होच्या तक्रारीवर वाहतूक विभागाने ट्विटरवर प्रतिक्रिया दिली की, जोगेश्वरी वाहतूक विभागाचे अधिकारी याबाबत चौकशी करतील आणि कोएल्हो यांनी अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडावी. त्यानंतर मंगळवारी जोगेश्वरी वाहतूक विभागातील एका अधिकाऱ्याने त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी कोएल्हो यांच्याशी संपर्क साधला. “परंतु त्याने लाच घेणाऱ्या पोलिसालाच सोबत आणलं. मी गुरुवारी कार्यक्षम अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे”, असं कोएल्हो म्हणाला.
ते खातं पोलिसाच नाहीच, अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण
वाहतूक शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा व्यवहार वाहतूक पोलिसाच्या नव्हे तर अमित पांडे नावाच्या व्यक्तीच्या खात्यात झाला आहे. चौकशी अहवाल आल्यावर कारवाई केली जाईल, असे ट्वीट वाहतूक पोलिसांनी केले आहे.