पुणे: पुण्यातील तालुक्यातील पाबळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ११ वर्षीय मुलीला अश्लिल व्हिडिओ दाखवून तिच्यावर काकानेच बलात्कार केला. आरोपी हा अल्पवयीन असून, त्याला ताब्यात घेतले आहे. त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. तर त्याच्या साथीदाराला पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळ झाली तरी, मुलगी घरी न आल्याने कुटुंबीय चिंतेत होते. आईने शेजारच्या एका मुलाला शोध घेण्यास सांगितले. त्याचवेळी मुलगी गावातील मंदिराजवळ रडत असताना त्याला दिसली. तिच्यासोबत दोघे जण होते. शेजारच्या मुलाने तिला घरी आणले. ती काका आणि मंगेश चव्हाण या तरुणासोबत मंदिराजवळ होती, असे त्याने तिच्या आईला सांगितले. याबाबत तिने मुलीला विचारला असता, तिनं घडलेला प्रकार सांगितला. काका आणि त्याच्यासोबत असलेल्या १९ वर्षीय मंगेश चव्हाण याने मंदिराचे मागे बोलावले. तिथे मला अश्लिल व्हिडिओ दाखवला आणि काकाने बलात्कार केला, असे तिने आईला सांगितले.

त्यानंतर पालकांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले. तसेच मंगेश चव्हाण याला अटक करण्यात आली आहे. हे दोघेही पाबळमधील रहिवासी आहेत. पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलगी ही आरोपीला ओळखते. नात्याने तो काका आहे. त्याने तिला बोलावून घेतले. तिथे तिला अश्लिल व्हिडिओ दाखवून बलात्कार केला. आरोपीसोबत मंगशे चव्हाणही होता. त्याने या गुन्ह्यात आरोपीला मदत केली. अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. तर चव्हाणला अटक केली. कोर्टाने अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात केली, तर मंगेश चव्हाणला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here