गुरुबाळ माळी, कोल्हापूर : कोल्हापुरात राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार, शह-काटशह, आरोप-प्रत्यारोपाने चांगलाच धुरळा उडाला आहे. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक हे दोघे आमने सामने आले आहेत. तब्बल २९ उमेदवार अपात्र ठरल्याने निवडणुकीत मोठी रंगत आली आहे. हे सारे चित्र एकीकडे असतानाच दुसऱ्या बाजूला याच घराण्यातील खासदार पुत्र विश्वराज मात्र वेगळ्याच विश्वात आहे. त्याने तब्बल १५ अंगणवाड्या दत्तक घेत समाजकारणातला रस दाखवून दिला आहे.

महाराष्ट्रात अंगणवाडीच्या बळकटीकरणासाठी ‘अंगणवाडी दत्तक’ योजना राबविली जात आहे. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून ही योजना राबविली जाते. राज्यभरातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी विविध सामाजिक संस्था, उद्योगपती पुढे येत आहेत. अशातच भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आणि भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी १५ अंगणवाड्या दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकार आणि भागीरथी संस्था यांच्यामध्ये आणि महिला व बालविकास खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार पार पडला आहे.

मर्दासारखं लढा, बावड्याचा पाटील मागे हटणार नाही, माझ्याकडे एक्का, डाव आम्हीच जिंकणार, बंटी पाटलांनी ललकारलं
एकीकडे राजकीय धुळवड सुरू असताना विश्वराज महाडिक यांनी समाजकारण करत घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. कारण १५ अंगणवाडी दत्तक घेतल्यानंतर याचा भौतिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक सुविधांसाठी येणारा सर्व खर्च विश्वराज महाडिक आणि भागीरथी संस्था यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे या अंगणवाडी केंद्राचा आदर्श व विकासात्मक कायापालट होणार आहे. अंगणवाडीतील लाभार्थ्यांना पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भसेवा, अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण, आरोग्य व आहार शिक्षण या सुविधा चांगल्या पद्धतीने पुरवल्या जाणार आहेत.

मग्रुरी सहन करणार नाही, हा DY पाटील कारखाना वाटला काय? रणांगणात या, मग बघतो : अमल महाडिक
भागीरथी संस्थेचा पुढाकार

भागीरथी संस्थेच्या माध्यमातून नेहमीच मोठ-मोठे सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहे. अरुंधती महाडिक यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, महिलांसाठी विविध कार्यशाळा घेण्यात येतात. यातच आता अजून एक भर पडली आहे. १५ अंगणवाडी दत्तक घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण देण्यात येणार आहे.

“भागीरथी संस्थेच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात. त्यातच आता अजुन एका उपक्रमाची भर पडली आहे. दत्तक घेतलेल्या अंगणवाडी स्मार्ट बनवण्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे. कारण ग्रामीण भागातील मुलं शिकली तर राज्याच्या आणि देशाच्या प्रगती भर पडणार आहे. महाराष्ट्र सरकारचा हा अतिशय चांगला उपक्रम आहे, यासाठी बाकीच्यांनीही पुढे यावे, अशी प्रतिक्रिया विश्वराज महाडिक यांनी दिलीये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here