मिशिगन: एका आईने आपल्याच पोटच्या पोरीला जिला तिने मोठ्या लाडाने वाढवलं तिलाच मृत्यूच्या दारात नेऊन टाकलं. या आईने आपल्या लेकीवर सपासप चाकूने वार करत तिची हत्या केली. जेव्हा या हादरवणाऱ्या घटनेमागील कारण पुढे आलं ते ऐकून सारेच सुन्न झाले. ही घटना तुम्हालाही आश्चर्यकारक वाटेल. जस्टिन एम. जॉन्सन नावाच्या २३ वर्षीय महिला आणि तिच्या ३ वर्षांच्या मुलीची ही हृदयद्रावक कथा आहे. या महिलेने आपल्या तीन वर्षीय गोंडस मुलीचा भोसकून खून केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे या महिलेने आपल्या मुलीवर तब्बल १७ वेळा चाकूने वार केला.

आईने मुलीवर १७ वेळा वार केले

डेली स्टारच्या वृत्तानुसार, एम जॉन्सन नावाच्या या महिलेने आपल्या तीन वर्षांची मुलगी सटॉन मेरी मॉसरची अतिशय निर्घृण आणि क्रूरपणे हत्या केली. रिपोर्टनुसार, मुलीने दोन दिवसांपूर्वी तिचा तिसरा वाढदिवस साजरा केला होता आणि त्यानंतर ती तिच्या आईने तिचा खून केला. या आईने मुलीवर १७ वेळा वार केले आणि तिचा मृतदेह कचऱ्याच्या प्लास्टिकच्या पिशवीत भरला.

वडील म्हणाले घरी जा अभ्यास कर, ९ वर्षांच्या इन्स्टा क्वीनने आयुष्यच संपवलं
मामाला पाय दिसला अन्

मुलीच्या मामाला म्हणजेच महिलेच्या भावाला कचऱ्याच्या पिशवीतून एक पाय बाहेर येत असल्याचं दिसलं. त्याने ती पिशवी उघडली आणि आपल्या भाचीची अशी अवस्था पाहून त्याला मोठा धक्का बसला. त्यानंतर त्याने तात्काळ पोलिसांना फोन केला आणि घडलेला सारा प्रकार सांगितला. पोलीसही लगेच घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत ही निर्दयी आई तेथून निघून गेली होती. अखेर साडेचार तासांनंतर पोलिसांना ती महिला सापडली.

मिळालेल्या माहितीनुसार, एम जॉन्सन ही स्मशानात जाऊन झोपली होती. त्यानंतर ती घरी परतली आणि तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात ती अपयशी ठरली. त्यानंतर तिने तिच्या मुलीला १७ वेळा चाकू भोसकला आणि तिचा जीव घेतला.

सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार

स्पंज बॉबने सूचना दिली होती, आईचा अजब दावा

एका अमेरिकन अॅनिमेशन मालिकेतील स्पंज बॉब या पात्राने तिला हे सर्व करण्यास सांगितले होते, असं महिलेने सांगितलं आहे. ही महिला ड्रग्ज घ्यायची आणि तिने केलेला हा दावा अत्यंत विचित्र होता. पण त्यामुळे एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, या प्रकरणाच्या सुनावणीनंतर या निर्दयी आईला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मुलीने नकार देताच त्याची सटकली, एकतर्फी प्रेमातून शिक्षकाचं धडकी भरवणारं कृत्य…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here