वाचा:
ई-पास असेल तरच चाकरमान्यांना कोकणात प्रवेश दिला जात असून ई-पास नसलेली सुमारे ५० वाहने आज (खेड ) चेकपोस्टवरून परत पाठवण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात जाणाऱ्या वाहनांची कशेडी चेकपोस्टवर कडक तपासणी करण्यात येत आहे. ई-पास, वैद्यकीय प्रमाणपत्र, वाहनातील प्रवाशी संख्या या सगळ्या बाबी नियमानुसार आहेत की नाहीत, हे तपासल्यानंतरच वाहनांना जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने या जिल्ह्यात जास्त खबरदारी घेतली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची तपासणी खारेपाटण येथे होत आहे. त्याशिवाय आंबोली घाटातही तपासणी नाका उभारण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यांत काही ग्रामपंचायतींचा अपवाद वगळता १४ दिवस होम क्वारंटाइनची सक्ती बहुतांश गावांत असून तपासणी नाक्यांवरील सोपस्कार पार पाडल्यानंतर थेट गावातील घरात जाऊन क्वारंटाइन होण्यास चाकरमान्यांना सांगितले जात आहे. या सगळ्या प्रक्रियेत काहीसा मनस्ताप सहन करावा लागत असला तरी गणेशोत्सव व गावाची ओढ या गोष्टींमुळे अनेकजण कोणत्याही तक्रारीविना हे सोपस्कार पार पाडत आहेत. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपली चूक आपल्याच आप्तांच्या आरोग्यासाठी धोक्याची ठरू शकते, याची सर्वांनाच कल्पना असल्याने किरकोळ प्रकार सोडले तर चाकरमान्यांचा प्रवास सुरळीतपणे सुरू आहे.
वाचा:
गणेशोत्सव यंदा २२ ऑगस्ट रोजी आहे. त्यात १४ दिवस क्वारंटाइन राहण्याची अट असल्याने ७ ऑगस्टपर्यंत चाकरमान्यांना गाव गाठावंच लागणार आहे. त्यामुळेच शनिवारपासूनच दोन्ही जिल्ह्यांत चाकरमान्यांचा ओघ वाढला असून पुढील दोन दिवसांत हा ओघ अधिकच वाढणार, हे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस, आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासनही सज्ज झालं असून तपासणी नाक्यांवर वाहनांची रखडपट्टी होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
वाचा:
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
These are actually great ideas in concerning blogging.
A big thank you for your article.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.