भोपाळ: मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग-३० वर अत्यंत खळबळजनक घटना घडली. येथे रस्त्यावर एक तरुण-तरुणी तडफडत असताना रस्त्यावरुन जाणाऱ्यांना दिसले. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठलं, त्या दोघांनी प्रकृती पोहून पोलिसांनी त्यांना लगेच रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि त्यांची तब्येत गंभीर असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांना जबलपूरला पाठवण्यात आलं. या दोघांनीही विष प्राशन केल्याची माहिती आहे.नेमकं काय घडलं?

२९ मार्च रोजी दुपारी राष्ट्रीय महामार्ग-३० वरून जात असताना एका व्यक्तीला एक तरुणी आणि तरुण रस्त्यावर पडलेले दिसले. त्याने आणखी काही लोकांना आवाज दिला. सर्वजण मिळून त्यांच्या जवळ गेले, त्यांची परिस्थिती पाहून लोक घाबरले. ते दोघेही जिवंत होते, पण ते विदनेने विव्हळत होते. त्यानंतर उपस्थितांपैकी एकाने लगेच डायल १०० वर कॉल केला. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रीकरणावेळी दरीत कोसळलेल्या युवकाचा मृत्यू

पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्या दोघांना जिल्हा रुग्णालयात पाठवले. येथील सिव्हिल सर्जन विजय धुर्वे यांनी सांगितले की, सकाळी दोन रुग्ण आमच्याकडे आले. विवेक पांडे (वय २३ वर्ष) असे या तरुणाचे नाव आहे. तर रागिणी बेगा असे या २० वर्षीय तरुणीचं नाव आहे. हे दोघेही छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील राहणारे आहेत. दोघांनी अज्ञात विषारी द्रव्य प्राशन केले आहे. दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

वडील म्हणाले घरी जा अभ्यास कर, ९ वर्षांच्या इन्स्टा क्वीनने आयुष्यच संपवलं
याप्रकरणी मंडलाचे एसपी रजत सकलेचा यांनी सांगितले की, हे तरुण-तरुणी कोरियाचे आहेत. दोघेही सुरतच्या दिशेने जात होते. दरम्यान, त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यानंतर दोघांनीही विषारी द्रव्य प्राशन केले. प्रथमदर्शनी दोघेही प्रेमीयुगुल असल्याचं दिसतं. दोघांचाही घरातील सदस्यांशी वाद झाला असावा आणि त्यातून त्यांनी हे पाऊल उचललं असावं. त्यांच्या प्रकृतीत सुधार झाल्यानंतरच खरं काय ते समोर येईल.

३ वर्षांच्या लेकीला संपवलं, पिशवीत भरलं; भावाला पाय दिसला अन्… निर्दयी आईची कहाणी वाचून हादराल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here