मुंबई : बुधवारचे व्यवहार सत्र देशांतर्गत शेअर बाजारासाठी लाभदायक ठरले. भारतीय मार्केट हिरव्या रंगात बंद झाले असताना एक ऊर्जा (एनर्जी) शेअरने बंपर उसळी घेतली. सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या स्टॉकमध्ये मागील व्यवहार सत्रात जबरदस्त तेजीने व्यवहार केला. कंपनीचे शेअर्स काल बुधवारी १४.७३ टक्क्यांपर्यंत वाढले. तर इंट्राडे ट्रेडमध्ये कंपनीचे शेअर्सच्या किमतींनी ८.१० रुपयांवर मुसंडी मारली. मात्र स्टॉक ७.९५ रुपये प्रति शेअरच्या किमतीवर बंद झाला. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ एका निवेदनानंतर दिसून आली. राइट्स इश्यू अंतर्गत थकबाकीदार समभागांचे पैसे भरले गेले आहेत, अशी माहिती सुजलॉन एनर्जीने बीएसईला दिली.

ऐकलं का..? आता गुंतवणूकदारांच्या फसवणुकीला बसणार आळा, SEBIने केलीय पूर्ण तयारी, वाचा सविस्तर
कंपनीचे विधान
त्यांनी २४०,००,००,००शेअर्स प्रति इक्विटी शेअर्स २.५० रुपये दराने घेतले आहेत आणि प्रत्येकी १ रुपये अतिरिक्त पेमेंट केले असल्याचे सुजलॉन एनर्जीने बीएसईला सांगितले. ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी राइट्स इश्यू अंतर्गत या शेअर्सचे वाटप करण्यात आले होते. याशिवाय, कंपनीने स्वतंत्र संचालक गौतम दोशी यांची तीन वर्षांच्या दुसऱ्या टर्मसाठी नियुक्ती केली आहे.

पाच वर्षांत किती घसरली शेअरची किंमत
बीएसईच्या आकडेवारीनुसार गेल्या १५ वर्षांत हा एनर्जी स्टॉक ९७% पर्यंत आपटला असून या काळात ११ जानेवारी २००८ रोजी शेअरची किंमत रु. ३९० होत जी सध्याच्या किंमतीवर कोसळली आहे. म्हणजेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असेल तर पाच वर्षांत पाच वर्षांत एक लाखाची गुंतवणूक केवळ १७०० रुपये इतकी राहिली असेल. दरम्यान, या वर्षी YTD मध्ये स्टॉक २५.८४% तुटला आहे, तर गेल्या एका वर्षात त्यात ७% ने घट नोंदवली.

झरझर चढले अन् धाडकन आदळले! न्यायालयाकडून गौतम अदानींना दिलासा पण गुंतवणूकदार धास्तावले
सुजलॉन एनर्जीचे तिमाही निकाल
दरम्यान, कंपनीने डिसेंबर तिमाहीत दुप्पट नफा कमाई केली. चालू आर्थिक वर्षात (२०२२-२३) कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा दुप्पट होऊन ७८.२८ कोटी रुपये इतका वाढला. कंपनीचा खर्च कमी झाल्यामुळे नफा वाढला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीने ३६.७७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. सुजलॉन एनर्जीचे उत्पन्न समीक्षाधीन तिमाहीत १,६१५ कोटी रुपयांवरून १,४६४ कोटी रुपयांवर घसरले असून या काळात कंपनीचा एकूण खर्चही १,३८६ कोटी रुपयांवर आला असून वर्षभरापूर्वी याच तिमाहीत खर्च १,५७३ कोटी रुपये होता.

(टीप : शेअर बाजारातील गुंतवणूक धोक्याच्या अधीन आहे. त्यामुळे, कोट्याही स्टॉक किंवा कंपनीत पैसा ओतण्यापूर्वी योग्य ती माहिती मिळवा आणि तुमच्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्या. वर दिलेली माहिती ही शेअरच्या कामगिरीबद्दल असून त्याला गुंतवणुकीसह सल्ला मानू नये)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here