नवी दिल्ली : जर तुम्ही गृहकर्ज किंवा इतर कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल किंवा नवीन कर्ज घेण्याची तयारी करीत असाल तर महत्वाची अपडेट जाणून घ्या. एप्रिल महिन्यात कर्ज आणखी महाग होऊ शकतात. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) एप्रिलमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करू शकते. यावेळी देखील रेपो दर ०.२५ टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो. आरबीआय नवीन आर्थिक वर्ष म्हणजे २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीच्या अखेरीस रेपो दर कमी करू शकते, असा अर्थतज्ज्ञांचा विश्वास आहे.मंगळवारी आरबीआय अधिकाऱ्यांनी अर्थतज्ज्ञांसोबत बैठक पार पडली. यावेळीही केंद्रीय बँक रेपो दरात ०.२५% वाढ करू शकते, असे या बैठकीत सुचवण्यात आले. दिवसेंदिवस वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक आपला रेपो दर वाढवत आहे. देशातील महागाई दर अजूनही रिझर्व्ह बँकेच्या ६% च्या मर्यादा पातळीच्या वरच आहे.

आधीच महागाई, त्यात दरवाढीची भीती! आरबीआय रेपो दरवाढीवर SBI चा अहवाल, दिलासा की धक्का?
कर्ज महागणार!
आरबीआयकडून रेपो दरात वाढ झाल्यास सर्व प्रकारची कर्जे महाग होतात. मे २०२३ पासून आरबीआयने रेपो दरात २.५० टक्क्यांनी वाढ केली आहे. रेपो दरात वाढ झाल्यामुळे गृहकर्ज घेणार्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

महागाई नियंत्रणात ठेवण्याचे आरबीआयचे उद्दिष्ट
महागाई नियंत्रित करण्यासाठी आरबीआय रेपो दर वाढवत असते. महागाई अजूनही 6 टक्क्यांच्या वर आहे. अॅक्सिस बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ सौगता भट्टाचार्य यांनी सांगितले की, आरबीआय या वेळीही रेपो दरात वाढ करण्याची शक्यता आहे. यावेळी ०.२५ बेसिस पॉइंट्सची वाढ केली जाऊ शकते.

नव्या आर्थिक वर्षात RBI चलनविषयक समितीची बैठक कधी? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
आरबीआय चलनविषयक समितीची बैठक
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पुढील आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकांचे वेळापत्रक जारी केले असून आरबीआयच्या MPC च्या पुढील आर्थिक वर्षात द्वि-मासिक चलनविषयक धोरण आढाव्यासाठी ६ बैठका होणार आहेत. पुढील आर्थिक वर्षाची पहिली बैठक ३ ते ६ एप्रिल दरम्यान होणार असून MPC प्रचलित देशांतर्गत आणि आर्थिक परिस्थितीवर चर्चा केल्यानंतर आरबीआय गव्हर्नर द्वि-मासिक चलनविषयक धोरण जाहीर करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here