अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) उद्यापासून म्हणजेच ३१ मार्चपासून सुरू होत आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला सामना खेळवला जाणार आहे. ३१ मार्च रोजी संध्याकाळी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. हे मैदान आधी मोटेरा क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखले जात होते, आता मोटेरा स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे.नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा चेन्नई आणि गुजरात संघ यांच्यातील हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल. तर या सामन्याची नाणेफेक ७ वाजता होईल. पहिल्या सामन्यात खेळपट्टी कशी असेल? नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराने गोलंदाजी कि फलंदाजी प्रथम निवडली पाहिजे? पाहूया.

IPL 2023 अलर्ट! कोणतं टीव्ही चॅनेल आणि मोबाइल ॲपवर फ्रीमध्ये दिसणार लाइव्ह? आधीच घ्या तपासून
IPL 2023 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. ही लढत गुरू आणि शिष्य यांच्यात होणार आहे. एका बाजूला महेंद्रसिंग धोनी तर दुसरीकडे हार्दिक पांड्या. हार्दिकने गेल्या वर्षी त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातला विजेतेपद मिळवून दिले होते. यावेळी दोन्ही संघांना विजयाने मोहिमेची सुरुवात करायची आहे.

फलंदाजीसाठी चांगली खेळपट्टी पण…

नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे, परंतु येथे वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये मदत मिळते आणि ते फलंदाजांसाठी अधिक घातक असते. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना लवकर उसळी मिळण्यात मदत करू शकते. नरेंद्र मोदी स्टेडियमवर आऊटफिल्ड संथ नसले तरी मोठ्या सीमारेषेमुळे येथे एकेरी दुहेरीवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल.

नाणेफेक जिंकल्यानंतर..

नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घ्यावा, असे जाणकारांचे म्हणणे आहे. या मैदानावर जिंकण्यासाठी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १८० पर्यंत धावा केल्या पाहिजेत, कारण या मैदानावर १६०-१७० धावांचा डोंगर सहज उभारता येतो.

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना कधी? जाणून घ्या संघाचे वेळापत्रक आणि संपूर्ण संघ फक्त एका क्लिकवर
सामन्यादिवशी कसं असेल हवामान

अहमदाबादमध्ये धुकं पाहायला मिळेल. सामन्याच्या दिवशी तापमान ३५ टक्के आर्द्रता आणि २.५ किमी प्रति तास वाऱ्यासह सुमारे २७ डिग्री सेल्सियस असण्याची अपेक्षा आहे आणि दृश्यमानता ४ किमी आहे. खेळादरम्यान पावसाची ३८ टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हार्दिक पांड्याने टॉस उंच उडवला, नाणं जमिनीवर पडलं अन् मग…

अशी असू शकते दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
गुजरात टायटन्स

शुभमन गिल, रिद्धिमान साहा, केन विल्यमसन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, शिवम मावी, यश दयाल

चेन्नई सुपर किंग्ज

डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, मोईन अली, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार) (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे, मिचेल सँटनर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here