मुंबई : करोना संसर्गानंतर देशांतर्गत शेअर बाजारात गुंतवणूकदारांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या यावर्षी ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदाच डिमॅट खात्यांची संख्या १०० दशलक्ष पार पोहोचली. तर शेअर मार्केटनेही गुंतवणूकदारांची निराशा केली नाही. अस्थिर जागतिक परिस्थितीत तेजीच्या काळात गुंतवणूकदारांना बंपर नफा मिळाला. परंतु युरोपमधील युद्धाच्या वातावरणामुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी झपाट्याने वाढली. अशा स्थितीत कमोडिटी मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या मागणीत तेजी दिसून आली आहे. कमोडिटी मार्केट म्हणजे काय आणि ते इक्विटी मार्केटपेक्षा वेगळे कसे आहे? हे तुम्हाला माहिती आहे का…कमोडिटी मार्केट म्हणजे काय?
कमोडिटी मार्केट हे एक मार्केटप्लेस आहे जिथे गुंतवणूकदार मसाले, मौल्यवान धातू, मूळ धातू, ऊर्जा, कच्चे तेल अशा अनेक वस्तूंमध्ये व्यापार करतात. सामान्यतः कमोडिटी वस्तूंचे चार प्रकारात वर्गीकरण केले जाते, तर भारतात दोन प्रकारच्या वस्तूंचा व्यापार होतो.
कमोडिटी मार्केट हे एक मार्केटप्लेस आहे जिथे गुंतवणूकदार मसाले, मौल्यवान धातू, मूळ धातू, ऊर्जा, कच्चे तेल अशा अनेक वस्तूंमध्ये व्यापार करतात. सामान्यतः कमोडिटी वस्तूंचे चार प्रकारात वर्गीकरण केले जाते, तर भारतात दोन प्रकारच्या वस्तूंचा व्यापार होतो.
- कृषी किंवा सॉफ्ट वस्तूंमध्ये काळी मिरी, धणे, वेलची, जिरे, हळद आणि लाल मिरची यांसारखे मसाले याशिवाय सोया बिया, मेंथा तेल, गहू, हरभरा यांचाही समावेश आहे.
- बिगर कृषी किंवा कठोर वस्तूंमध्ये सोने, चांदी, तांबे, जस्त, निकेल, शिसे, अॅल्युमिनियम, कच्चे तेल, नैसर्गिक वायू यांचा समावेश होतो.
इक्विटी मार्केट आणि कमोडिटी मार्केटमध्ये काय फरक?
- इक्विटी बाजारात सूचिबद्ध कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी-विक्री केली जाते. यामध्ये कच्चा माल कमोडिटी मार्केटमध्ये विकला आणि खरेदी केला जातो.
- इक्विटी धारकांना शेअरधारक म्हणतात, तर कमोडिटी धारकांना ऑप्शन म्हणतात.
- शेअरहोल्डरना कंपनीचे आंशिक मालक मानले जाते, परंतु कमोडिटी मालकांना नाही.
- इक्विटी शेअर्सची कालबाह्यता तारीख नसते, पण वस्तूंमध्ये तसे होत नाही.
- इक्विटी मार्केटमधील भागधारक लाभांशासाठी पात्र मानले जातात. दुसरीकडे, कमोडिटी मार्केटमध्ये लाभांशाची तरतूद नाही.
भारतातील प्रमुख कमोडिटी एक्सचेंजेस
देशात कमोडिटी ट्रेडिंगसाठी प्रमुख एक्स्चेंज आहेत. यामध्ये मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स), नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज (NCDEX) तसेच युनिव्हर्सल कमोडिटी एक्सचेंज (UCX), नॅशनल मल्टी कमोडिटी एक्सचेंज (NMCE), इंडियन कमोडिटी एक्सचेंज (ICEX), ACE डेरिव्हेटिव्ह्ज आणि कमोडिटी एक्सचेंज लिमिटेड यांचा समावेश आहे.
गुंतवणूक करताय… हे लक्षात घ्या!
कमोडिटी बाजारात ट्रेडिंग कशी होते?
तुमहाला कमोडिटीजमध्ये ट्रेडिंग सुरू करायची असेल तर डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. डीमॅट खाते तुमचे सर्व व्यवहार आणि होल्डिंग सुरक्षित करेल, मात्र तुम्हाला एक्सचेंजवर ऑर्डर देण्यासाठी ब्रोकरद्वारे जावे लागेल.