दुसरीकडे नकारात्मक परतावा मिळालेल्या ४० टक्के आयपीओमध्ये एलआयसीने मूल्याच्या बाबतीत सर्वाधिक नुकसान केले. दुसरीकडे इतर काही आयपीओमध्ये ४०-५० टक्के कमजोरी होती. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ३० आयपीओ लाँच करण्यात आले होते. ज्यापैकी १४ शेअर्सने आतापर्यंत नकारात्मक परतावा दिला आहे.
एलआयसीकडून सर्वात मोठे नुकसान
मूल्याच्या बाबतीत सर्वात जास्त तोटा एलआयसी इंडियाच्या आयपीओमध्ये झाला आहे. ९४९ रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत शेअर्समध्ये ४४% घसरण झाली असून सध्या हा शेअर ५३२ रुपयांवर आहे. अशा प्रकारे गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटींहून अधिक रुपये बुडाले आहेत. जेव्हा कंपनीचा आयपीओ आला तेव्हा त्याचे मूल्यांकन ६ लाख कोटी इतके होते, जे आता ३.४ लाख कोटींच्या आसपास घसरले आहेत. म्हणजे गुंतवणुकदारांना २.६ लाख कोटींचं नुकसान सोसावं लागलं आहे.
सर्वाधिक घसरलेला आयपीओ
गेल्या एक वर्षाबद्दल बोलायचे तर टक्केवारीच्या परताव्याच्या बाबतीत एलिन इलेक्ट्रॉनिकचा आयपीओ सर्वात वाईट ठरला आहे. ३० डिसेंबर २०२२ रोजी सूचीबद्ध झालेला हा शेअर सूचीबद्ध झाल्यानंतर आयपीओ किंमतीच्या तुलनेत ५२% घसरला असून शेअर २३०.६५ रुपयांच्या आयपीओ किमतीच्या तुलनेत सध्या ११८.४० रुपयांवर आहे.
या नवीन शेअर्समध्येही मोठी घसरण
केफिनटेक २९ डिसेंबर २०२२ रोजी सूचीबद्ध झाल्यानंतर आयपीओ किमतीच्या तुलनेत २४% घसरला. दुसरीकडे २३ डिसेंबर २०२२ रोजी सूचीबद्ध झालेला अबन्स होल्डिंग्सचा शेअर २१% गडगडला आहे. याशिवाय धर्मज क्रॉप ४१$, आयनॉक्स ग्रीन ३७%, टीएमबी २४%, दिल्लीवरी ३४%, एलआयसी इंडिया ४४% घसरले आहे. उमा एक्स्पोर्ट्सचे शेअर ४६ टक्क्यांनी घसरले, तर तामिळनाड मर्कंटाइल बँक २१ टक्क्यांनी घसरले आहे.
‘आयपीओ’मध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात आहात, ‘या’ गोष्टी समजून घ्या
कोणत्या शेअर्सनी दिला चांगला परतावा
प्रुडंट अॅडव्हायझरच्या शेअरने आयपीओ किंमतीच्या २९%, फाइव्ह-स्टार बसिन १५%, बिकाजी फूड्स २०%, फ्यूजन मायक्रो १०%, इलेक्ट्रॉनिक्स मार्ट १३%, सिरमा SGS १८%, इथॉस ८%, परदीप फॉस्फेट्स २२%, कॅम्पस अॅक्टिव्ह ११%, ग्लोबल सर्फेसेस १२%, दिवगी टॉर्कट्रान्स ८%, साह पॉलिमर्स ७%, लँडमार्क कार्स १ टक्के आणि सुला व्हाइनयार्ड १% इतका परतावा दिला आहे.