कॅनबेरा: तुम्ही रस्त्यानं चालला आहात. तितक्यात तुमच्या हाती असं काही लागतं की तुमचं नशीब उघडतं. तुम्ही कोट्याधीश होता, असा विचार कधी केलाय का? ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीसोबत असा प्रकार घडला आहे. एक व्यक्ती हातात मेटल डिटेक्टर घेऊन चालत होता. तितक्यात त्याला एक दगड हाती लागला. मेटल डिटेक्टरनं सिग्नल दिल्यानं व्यक्तीनं दगड उचलला आणि तो घरी आणला.ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरियामध्ये ही घटना घडली. द गार्डियननं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मात्र सोन्याचा दगड हाती लागलेल्या व्यक्तीचं नाव वृत्तात देण्यात आलेलं नाही. संबंधित व्यक्ती सहजच घराबाहेर पडली. पाय मोकळे करण्यासाठी निघालेल्या व्यक्तीनं मेटल डिटेक्टरसोबत घेतलं होतं. फिरताना एका ठिकाणी मेटल डिटेक्टरनं बीप बीप आवाज केला. हा आवाज नेमका कुठून येतोय यासाठी त्यानं शोधाशोध केली. तेव्हा त्याला सोनं सापडलं. व्यक्तीच्या हाती लागलेल्या दगडाचं वजन करण्यात आलं असता ते साडे चार किलो इतकं भरलं. या दगडात दीड किलो सोनं होतं.
स्मशानात रोज रात्री प्रेतयात्रा यायच्या, चिता पेटायच्या; संशयावरून पोलिसांचा छापा अन् मग…
व्यक्तीला सापडलेल्या सोन्याची किंमत जवळपास १ कोटी ३१ लाख रुपये आहे. व्हिक्टोरिया परिसरात व्यक्तीला दगड सापडला. हा परिसर १८०० सालापासूनच सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. साडे चार किलोच्या दगडातून संबंधित व्यक्तीला सोनं सापडलं. हा सोन्याचा दगड हॅरेन कॅम्प यांना खरेदी केला. गेल्या ४३ वर्षांत अशा प्रकारची वस्तू पाहिली नसून हा दगड अद्भुत असल्याचं कॅम्प म्हणाले.

सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्सटॉर्शनला बळी पडला असाल तर काय कराल?

अनेकदा लोक सोन्यासारखे दिसणारे दगड घेऊन येतात. मात्र ते सोनं नसतं. मात्र या व्यक्तीनं आणलेल्या सोन्याची पारख करून पाहण्यात आली. तेव्हा दगडात दीड किलो सोनं आढळून आलं, अशी माहिती कॅम्प यांनी दिली. जगातील सर्वाधिक सोनं ऑस्ट्रेलियात आहे. देशात सोन्याच्या मोठ्या खाणी आहेत. मात्र अशा प्रकारे मेटल डिटेक्टरनं एखाद्याला सहज सोनं आढळल्याची घटना दुर्मीळ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here