मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी वर्धा जिल्ह्यातील नेहाल पांडे या युवकानं नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथून २१ मार्चपासून महाभारत यात्रा सुरु केली होती. आज ती यात्रा उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी दाखल झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं. उद्धव ठाकरे म्हणाले एका दृष्टीने जर पाहिलं तर असं कोणीतरी कोणासाठी एवढे किलोमीटर पायपीट करत येणं हे आत्ताच्या काळात अवघड नाही अशक्य आहे. पण तुम्हाला असं वाटलं की इथे यावं मातोश्रीत यावं आणि माझ्यासोबत उभं राहावं. मी हा एक रामांचा आशीर्वाद मानतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. माझं धनुष्यबाण चोरुन नेलं असलं तरी श्रीरामांचे आशीर्वाद माझ्यासोबत असून आपल्याकडे ब्रह्मास्त्र आहे, असं उद्ध ठाकरे म्हणाले. धनुष्यबाण चोरल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी यावेळी नाव न घेता एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली.

तुम्ही रामटेकमधून निघालात आणि पोहोचलात बरोबर रामनवमीला ठीक आहे. काही काळाकरता धनुष्यबाण चोरला असला तरी प्रभू राम माझ्यासोबत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ज्याप्रमाणे राम सेतू बांधताना वानरसेना तर होतीच पण खार पण होती. त्याच्यामुळे प्रत्येकानं मी काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे. त्यावेळेला खारीने तिचा वाटा उचलला तर आपण सगळे जिथे माणसे एकत्र आलो तर लंकादहन करू शकत नाही का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. प्रभू रामचंद्राचं नाव लिहून दगड टाकला तरी तो तरंगायचा, आता राजकारणात तेच झालेलं आहे. प्रभू रामाचं नाव घेऊन दगड तरंगत आहेत पण त्या दगडांवर पाय ठेवू लंकेत जाण्यासाठी ते दगड तरंगले होते. आता दगडच तरंगतात आणि दगडच राज्य करतात. मग खऱ्या रामभक्तांनी करायचं काय? ते राम भक्ताचं काम शिवसैनिकांनी करावं, अशी अपेक्षा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

जनसामान्यांच्या सेवेचा वसा… बापटांचं शनिवार पेठेतील कार्यालय निधनाच्या अवघ्या २४ तासांच्या आत सुरु

आपल्याला देशाच्या संविधानाचा बचाव करायचा नाही तर संरक्षण करायचं आहे. बचाव बचाव म्हणजे हे थोडसं अअसहाय्यतेचं लक्षण आहे. मी माझ्या संविधानाचं संरक्षण करणार हा एक आत्मविश्वास तुमच्यात असला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. कोण कोणाची हिंमत आहे बघतो ना, संविधानाला किंवा लोकशाहीला नष्ट करण्याची या देशात हिंमत कोण करतंय तेच मी बघतो ना. मी आहे माझ्याशी गाठ आहे. मी रक्षण करणार माझ्या लोकशाहीचं आणि माझ्या देशाचं हा आत्मविश्वास आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

छत्रपती संभाजीनगरच्या घटनेत खैरेंनी फडणवीस-कराडांचं नाव घेतलं, उपमुख्यमंत्री म्हणाले भडकावू वक्तव्य नको…

ज्या एका जिद्दीने रामटेक ते इथपर्यंत पायी आलात. मला आता तुम्ही जिथून जिथून आला असाल वाड्या, वस्त्या, पाड्या, खेड्यामध्ये ही तुमच्यातली जिद्द आणि इर्षा आहे ना ती तिकडे पसरवण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. असेच सोबत राहा तुम्ही सगळेजण सोबत आहात हीच माझी ताकद आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. कागदावरचा नेला असला तरी हे बाण माझे माझ्या भात्यात आहेत. हे बाण नाहीत तर ब्रह्मास्त्र असून माझ्यासोबत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

द्वेषाचा नाही इथं प्रेमाचा उत्सव भरतो; साईंच्या शिर्डीत मुस्लीम बांधव रामजन्मोत्सवात तर हिंदू बांधव संदल उरुसात दंग!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here